दैनिक स्थैर्य । दि. २९ ऑक्टोबर २०२२ । सातारा । महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यामार्फत महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा-2022 शनिवार दि. 5 नोव्हेंबर 2022 रोजी सातारा तालुक्यातील 17 विद्यालय, महाविद्यालयांमध्ये होणार आहे. दि. 5 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 8 ते सायं. 6 वाजेपर्यंत सातारा जिल्ह्यातील परीक्षा उपकेंद्रांच्या 100 मीटर परिसरात अपर जिल्हादंडाधिकारी सुनिल थोरवे यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 प्रमाणे आदेश लागू केले आहेत.
परीक्षा होणारे केंद्रे पुढीलप्रमाणे. अनंत इंग्लिश स्कूल, मंगळवार पेठ, सातारा, आण्णासाहेब कल्याणी हायस्कूल, सदरबझार कॅम्प, सातारा, कन्या शाळा, 155 अ/ब भवानी पेठ, सातारा, लालबहादूर शास्त्री कॉलेज, 17 मल्हार पेठ, सातारा, महाराजा सयाजी विद्यालय ॲन्ड ज्युनिअर कॉलेज, कर्मवीर समाधी परिसर, पोवई नाका, सातारा, न्यू इंग्लिश स्कूल, सोमवार पेठ, सातारा, यशोदा टेक्निकल कॅम्पस, फॅकल्टी ऑफ इंजिनिअरिंग, राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 जवळ, वाढे फाटा, सातारा, यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्युट ऑफ सायन्स कॅम्प, सदरबझार कॅम्प, सातारा भाग- अ, यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्युट ऑफ सायन्स सदरबझार कॅम्प, सातारा भाग- ब, कर्मवीर भाऊराव पाटील पॉलेटेक्निक, पानमळेवाडी, पो.वर्ये, ता. जि. सातारा, निर्मला कॉन्व्हेंट स्कूल, सदरबझार सातारा, कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनीयरिंग, सदरबझार, आरटीओ ऑफिस शेजारी सातारा, श्रीपतराव पाटील हायस्कूल ॲड ज्युनिअर कॉलेज, करंजपेठ, सातारा, पोदार इंटरनॅशनल स्कूल, सर्व्हे नं. 43, प्लॉट नं. 1 व 2, पंडीत पार्क, तामजाईनगर, करंजे पेठ, सातारा, सौ. सुशिलादेवी साळुंखे माध्यमिक विद्यालय, 17 मल्हार पेठ, सातारा, भवानी विद्या मंदिर ॲण्ड ज्युनिअर कॉलेज, 17 मल्हार पेठ सातारा, छत्रपती शिवाजी कॉलेज, सदरबझार, कॅम्प, सातारा.
वरील नमुद उपकेंद्राच्या परिसरात व त्या सभोवतालच्या 100 मीटर परिसरात परीक्षार्थी, परीक्षेसाठी नेमलेले अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा अधिकारी-कर्मचारी यांना वगळून इतर व्यक्तींना प्रवेश करण्यास या आदेशान्वये मनाई असेल. तसेच दोन किंवा दोन पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई असेल. तसेच विद्यालय-महाविद्यालयाच्या परिसरातील सार्वजनिक टेलिफोन, एस.टी.डी. बुथ, आय. एस. डी. बुथ, फॅक्स केंद्रावर मोबाईल, वायरलेस सेट, ट्रँझीस्टर, रेडिओ, कॅल्क्युलेटर, लॅपटॉप परीक्षा केंद्राच्या 100 मीटरपर्यंत परिसरात वापरण्यास व जवळ बाळगण्यास तसेच परीक्षा केंद्रात नेण्यास या आदेशान्वये मनाई केली आहे.