
दैनिक स्थैर्य | दि. १ मे २०२४ | फलटण |
वाखरी, ता. फलटण गावच्या यात्रेच्या अनुषंगाने गावातील दोन्ही गटांचा वाद मिटण्याची शक्यता नसल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून गावचा यात्रा कालावधी दि. १ मे ते ५ मे २०२४ दरम्यान फलटणचे उपविभागीय दंडाधिकारी सचिन ढोले यांनी फौजदारी संहिता १९७३ कलम १४४ लागू केले आहे. त्यामुळे दि. १ मे ते ५ मे दरम्यान वाखरी गावात खालील प्रतिबंधात्मक आदेश लागू आहेत.
- दि. १ ते ५ मे या यात्रा कालावधीत कोणत्याही करमणूक कार्यक्रमास प्रतिबंध
- वरील कालावधीत ग्रामदैवत भैरवनाथ देवाचा छबिना काढण्यास प्रतिबंध. तसेच काठी मिरवणूक काढणे व काठीला पैसे
- बांधण्याच्या विधीस प्रतिबंध करण्यात आला आहे.
- कोणत्याही राजकीय व धार्मिक प्रकारच्या मिरवणुकीस प्रतिबंध
- कोणत्याही व्यक्तीकडून कोणत्याही प्रकारची रोख रक्कम अथवा वस्तू स्वरूपातील वर्गणी अगर देणगी स्वीकारण्यास प्रतिबंध
- वाखरी गावात वरील कालावधीत पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र जमाव करण्यास प्रतिबंध
असे प्रतिबंध लागू केले असून ग्रामदैवत भैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्त देवाची नित्यपूजा, धार्मिक विधी, लग्नपरंपरा याबाबत सर्व आवश्यक ती कार्यवाही मंदिराचे पुजारी यांनी करावी, त्यास कोणतीही अडचण नाही, असे उपविभागीय दंडाधिकारी सचिन ढोले यांनी आदेशाद्वारे सांगितले आहे.