निंबळक सोसायटीच्या वतीने सचिव संदीप कदम सन्मानित


दैनिक स्थैर्य । दि. २५ जानेवारी २०२३ । फलटण । निंबळक विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे सचिव संदीप कदम यांनी मुंबई येथे १५ जानेवारी२०२३ रोजी झालेल्या टाटा हाफ मॅरेथॉन स्पर्धेत २१.४ कि. मी. चे अंतर फक्त २ तास ८ मिनिटात पूर्ण करून निंबळकच्या नावलौकिकात भर घातल्याबद्दल त्यांचा सत्कार सोसायटीच्या वतीने सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी कांतीलाल भोसले यांचे हस्ते शाल, श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

कदम यांनी यापूर्वीही सातारा अर्ध मॅरेथॉन मध्ये भाग घेऊन ‘रजत पदक ‘ पटकावले आहे. या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.

सदर कार्यक्रमास माजी चेअरमन दादासाहेब कापसे, युवा नेते मेघराज नाईक निंबाळकर, व्हाईस चेअरमन अमृत पवार, संचालक विलासराव यादव, जालिंदर ढमाल, बापूराव यादव, अनिल बनकर व बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!