स्थैर्य, सातारा, दि. १२ : सातारा शहर व परिसरात दुचाकी व वाहनांच्या बॅटरी चोरणाऱ्या दोन अल्पवयीन युवकांना तसेच भंगार व्यावसायिकास जेरबंद केले आहे. शाहूपुरी पोलिसांनी ही कारवाई केली असून त्यांच्याकडून 1 लाख रुपयांचा चोरीचा माल हस्तगत केला आहे. पाच गुन्हे उघडकीस आणले आहेत. दोन चोरीच्या दुचाकी व ६० हजार रुपये किंमतीच्या ११ बॅटऱ्या असा मुद्देमाल हस्तगत करुन शाहुपुरी पोलीस स्टेशन, सातारा शहर व सातारा तालुका पोलीस ठान्याच्या हद्दीतील पाच चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. या गुन्हयांचा पुढील तपास पो. हेड. कॉ. शंकर गायकवाड व पो. हेड. कॉ. सुनिल मोहरे हे करीत आहेत.ही कारवाई पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र साळुखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर सहा.पोलीस निरीक्षक संदिप शितोळे, पो.हेड.कॉ. हसन तडवी, पोलीस नाईक लैलेश अशोक फडतरे, अमित माने, स्वप्निल कुंभार, पो.कॉ.ओंकार यादव, मोहन पवार, पंकज मोहिते चालक नितीन शिंगटे यांनी केली आहे .