क्रीडा संकुलमध्ये शालेय तालुकास्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धा संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २० सप्टेंबर २०२३ | बारामती |
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हा क्रीडा परिषद पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे आयोजित शालेय तालुकास्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धा दि. १६ व १७ सप्टेंबर रोजी जिल्हा क्रीडा संकुल, बारामती या ठिकाणी संपन्न झाली. स्पर्धेमध्ये १४/१७/१९ मुले/मुली अशा गटात एकूण ७२ शाळांच्या संघांनी सहभाग नोंदवला होता.

स्पर्धेचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कार्यालय अधीक्षक हनुमंत पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी तालुका क्रीडाधिकारी महेश चावले, प्रा. लक्ष्मण मेटकरी, प्रा. अशोक देवकर, प्रा. किरण पवार, संजय लोंढे, धनंजय यादव, व्हॉलिबॉल प्रशिक्षक अक्षय तावरे, प्रो-कब्बडी खेळाडू दादासो आव्हाड, मोहन कचरे, दत्तात्रय चव्हाण, महेश रणवरे, अभिजित दरेकर, कराटे असोसिएशनचे रविंद्र कराळे, अभिमन्यू इंगुले उपस्थित होते.

स्पर्धेतील विजेते संघ पुढीलप्रमाणे –
१४ वर्षे मुले – नवमहाराष्ट्र विद्यालय पणदरे
१७ वर्षे मुले – चैतन्य इंटरनॅशनल स्कूल बारामती
१९ वर्षे मुले – शारदाबाई पवार विद्यानिकेतन शारदानगर
१४ वर्षे मुली – म.ए.सो.ग.भि.देशपांडे विद्यालय बारामती
१७ वर्षे मुली – म.ए.सो.ग.भि.देशपांडे विद्यालय बारामती
१९ वर्षे वयोगट मुली – विद्या प्रतिष्ठानचे कला विज्ञान व
वाणिज्य महाविद्यालय बारामती.

वरील सर्व विजयी संघ जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी बारामती तालुक्याचे प्रतिनिधी करतील.विजेत्या संघास सौ. शितलताई वैभव मोरे, सरपंच मूर्टी-मोढवे यांच्या वतीने ट्रॉफी देण्यात आली. राष्ट्रीय व्हॉलिबॉल मार्गदर्शक शिवाजी जाधव यांनी स्पर्धेचे संयोजन केले.


Back to top button
Don`t copy text!