दैनिक स्थैर्य | दि. १९ सप्टेंबर २०२३ | फलटण |
सहकार महर्षी हणमंतराव पवार हायस्कूल, फलटण येथील इयत्ता १० वीतील विद्यार्थ्यांनी आदिती उत्तम जाधव हिने जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी सातारा यांच्यावतीने कोरेगाव येथे आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय शालेय कुस्ती क्रिडा स्पर्धेत ६५ किलो वजन गटात प्रथम क्रमांक पटकाविला असून तिची कोल्हापूर येथील विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
शाहू प्रबोधिनी पब्लिक स्कूल कोनवडे, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर येथे १७ वर्षे मुले / मुली ग्रीको रोमण फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धा होणार आहेत.
आदिती जाधव हिची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झालेबद्दल शनिवारी फलटण येथे श्री सद्गुरू हरिबुवा महाराज शिक्षण संस्थेचे संस्थापक दिलीपसिंह भोसले, सचिव अॅड.सौ. मधुबाला भोसले, अध्यक्ष तुषार गांधी, संचालक तेजसिंह भोसले, महाराजा मल्टीस्टेटचे व्हा. चेअरमन रणजितसिंह भोसले, प्रशासकीय संचालिका सौ. स्वाती फुले यांनी तिचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.