शालेय महासंघाचा वाद ऑलिम्पिक तयारीत अडसर; सत्रातील राष्ट्रीय स्पर्धेलाही मुकणार : सुशीलकुुमार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, नवी दिल्ली, दि.२: भारतीय शालेय क्रीडा महासंघातील (एसजीएफआय) आपापसातील वादाचा माेठा फटका बसला. यामुळे मला आगामी आॅलिम्पिकची तयारीही करता आली नाही. सरावामध्ये माेठा खंड पडला. हाच वाद या सर्व गाेष्टीला कारणीभूत ठरला आहे. यामुळेच आता मला यंदाच्या सत्रात हाेणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेतही सहभागी हाेता येणार नाही. कारण, माझी त्यासाठीची समाधानकारक अशी तयारी झालेली नाही, अशा शब्दात दाेन वेळच्या आॅलिम्पिक पदक विजेत्या कुस्तीपटू सुशील कुमारने प्रतिक्रीया दिली. शालेय महासंघामध्ये मागील वर्षभरापासून सुरू असलेला वाद आता चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळेच सध्या यातील पदाधिकारी माेठ्या प्रमाणात एकमेंकावर आराेप करत आहेत. यामध्ये माेठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहारही झाल्याची चर्चा आहे.यातूनच सुशील कुमारने महासंघशच्या माजी सचिवाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

‘मी तो ऑलिम्पिक तयारीत एक महिना मागे पडला. त्यामुळे राष्ट्रीय स्पर्धेत खेळणार नाही. मात्र, लवकरच मी तयारी सुरु करतोय आणि ऑलिम्पिक पात्रतेसाठी सर्वस्व पणाला लावेल. आपले कुस्तीपटू या वर्षी टोकियाे ऑलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी करतील. आपली राष्ट्रीय स्पर्धा २३ व २४ जानेवारी रोजी नोएडा येथे होईल. त्याचबरोबर ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवलेल्या बजरंग पुनिया व विनेश फोगाट राष्ट्रीय स्पर्धेत खेळणार नाही. ते विदेशात सराव करत आहेत, असेही २००८ बीजिंग ऑलिम्पिक व २०१२ लंडन ऑलिम्पिकचा पदकविजेता आणि एसजीएफआयचा माजी अध्यक्ष सुशीलकुमारने सांगितले.

याच वादातून आताा सुशील कुमारने महासंघाचे माजी सचिव राजेश मिश्रावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्याने म्हटले की, १२ नोव्हेंबर रोजी भारत सरकारकडून मला एक पत्र मिळाले. त्यात अनेक मुद्द्यांवर अनेक वेळा त्यांना माहिती मागवली, परंतु त्यांनी अद्यापही दिली नाही. मी माहिती घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे कळाले. चौकशी झाल्यास कोट्यवधी रुपयांचा घोटाळा समोर येऊ शकतो.

एकाच खेळाडूच्या नावावर दोन ठिकाणी काढले पैसे
महासंघातील गैरव्यवहारावरही सुशील कुमारने चांगलीच टीका केली. याशिवाय त्याने हा सर्व प्रकार उघडकीस आणला आहे. यातूनच आता खेळाडूंच्या नावे झालेला आर्थिक गैरव्यवहार समाेर आला आहे. माजी अधिकाऱ्याने माझ्या खोट्या स्वाक्षऱ्याच केलेल्या नाहीत तर एकाच खेळाडूच्या नावावर दोन ठिकाणी पैसे काढले. म्हणजे पैशाची अफरातफर केली. जसे आंतरराष्ट्रीय खेळणाऱ्या खेळाडूसाठी राज्य सरकारकडून पैसा घेतला आणि भारत सरकारकडूनही. असे किती खेळाडूंसोबत घडले ते चौकशीनंतर स्पष्ट होईल. त्याने म्हटले की, मी सध्या महासंघातील समस्या दूर करण्याचा प्रयत्न करतोय. माहितीनुसार, एफजीएफआयची काही दिवसांत दोन वेळा निवडणूक झाली. त्यात नव्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. मात्र, त्यामध्ये सुशील कुमारला स्थान देण्यात आले नाही. महासंघाला अद्याप भारत सरकारकडून मान्यता मिळाली नाही, असेही सुशील कुमारने सांगितले. त्यामुळे आता या प्रकरणी त्याने दाेषींवर कारवाई करण्याची मागणी केली.


Back to top button
Don`t copy text!