
दैनिक स्थैर्य । दि. २३ जुलै २०२३ । बारामती । लोकशाही देशातील निवडणूक प्रक्रिया शालेय वयातच समजावी, उमेदवारी अर्ज मागविण्यापासून निकाल लागेपर्यंतच्या सर्व बाबी विद्यार्थ्यांना या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी,विद्यार्थ्यांमधून देशाचे भावीदृष्ट्या व विवेकी नेतृत्व विकसित व्हावे म्हणून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.इयत्ता पाचवी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी मतदार म्हणून सहभाग नोंदवला.मतदानासाठी इयत्ता आठवी ते दहावीचे 14 उमेदवार विद्यार्थी उभे राहिले होते.विद्यार्थ्यांचे 100% टक्के मतदान झाले.उमेदवारी अर्ज मागवणे,छाननी करणे,मतपत्रिका छापने,गुप्त पद्धतीने मतदान करणे,शाई लावणी या संपूर्ण प्रक्रियेमध्ये विद्यार्थी आनंदाने सहभागी झाले होते.विजेत्या विद्यार्थ्यांकडे विद्यार्थी प्रतिनिधी(𝙱.𝚁/𝙶.𝚁), आरोग्य विभाग प्रमुख, परीक्षा विभाग प्रमुख, सांस्कृतिक विभाग प्रमुख, स्वच्छता विभाग प्रमुख, क्रीडा विभाग प्रमुख, शिस्त विभाग प्रमुख अशी खाते वाटप करण्यात आले. ज्ञानसागर गुरुकुल संस्थेचे अध्यक्ष सागर आटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुख्याध्यापक मा. दत्तात्रय शिंदे व केंद्राध्यक्ष म्हणून योगेश तांबे तसेच मतदान अधिकारी म्हणून सुहास चव्हाण व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनीही काम पाहिले.सर्व विजेत्या उमेदवारांचा सत्कार स्काऊट गाईड आंतरराष्ट्रीय कमिशनर मधुसदन आवालातसेच संस्थेचे अध्यक्ष सागर आटोळे,सचिव मानसिंग आटोळे,विभाग प्रमुख गोरख वणवे,उपाध्यक्षा रेश्मा गावडे,विश्वस्त पल्लवी सांगळे,दीपक सांगळे, दिपक बिबे,सी.ई.ओ.संपत जायपत्रे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.विजेते विद्यार्थी,विद्यार्थिनी खातेनिहाय प्रतिनिधी पुढीप्रमाणे.विद्यार्थी प्रतिनिधी(BR)श्रवण गोफणे(9वी ) व विद्यार्थीनी प्रतिनिधी कु.स्वरांजली शिंदे(10 वी )परीक्षा विभाग प्रतिनिधी-प्रवीण दराडे(8वी) व कु. स्वरा टकले(8वी)स्वच्छता विभाग प्रतिनिधी-सार्थक माने(8वी) व कु. सिद्धी शिंदे(9वी)सांस्कृतिक विभाग प्रतिनिधी-ओम गावडे(8वी) व कुमारी संध्या ढाले(9 वी)क्रीडा विभाग प्रतिनिधी-सुजल जाधव(8वी) व संस्कृती झगडे(8वी),आरोग्य विभाग प्रतिनिधी-विनय आटोळे(9वी) व कु. प्रचिती क्षीरसागर (8वी)निवडणुक निकाल समारंभ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. संस्कृती कुटे हिने तर आभार कलाशिक्षक श्रीराम सावंत यांनी मानले.