दैनिक स्थैर्य । दि. ०३ नोव्हेंबर २०२२ । मुंबई । आयस्कूलकनेक्ट इन्क. या एआय-आधारित एडटेक कंपनीने नुकतेच त्यांची सर्वात मोठी परोपकारी मोहिम आयस्कूलकनेक्ट स्कॉलरशिपचा भाग म्हणून परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा असलेल्या ३७ इच्छुकांना पुरस्कारित केले. जगभरातून मिळालेल्या ५,००० हून अधिक अर्जदारांमधून आयस्कूलकनेक्ट स्कॉलरशिप पुरस्कार समितीने मार्गात आलेल्या अडथळ्यांकडे न पाहता परदेशात शिक्षण घेण्याचा अपवादात्मक संकल्प दाखवलेल्या ३७ विद्यार्थ्यांची निवड केली.
आयस्कूलकनेक्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी व संस्थापक आशिष फर्नांडो म्हणाले, “आंतरराष्ट्रीय उच्च शिक्षण क्षेत्रामधील स्कॉलरशिप्स इच्छुकांना मोठ्या प्रमाणात मदत करतात. पण अनेक स्पर्धात्मक प्रोफाइल्समुळे सर्वात पात्र विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न साकारण्यामध्ये मदत करण्यासाठी आर्थिक साह्यतेचे मार्ग वाढवण्याची गरज आहे. मी ग्रॅज्युएट व अंडरग्रॅज्युएट प्रोग्राम्ससाठी जागतिक प्रवेश बाजारपेठेचे लोकशाहीकरण करण्याच्या दृष्टिकोनासह आयस्कूलकनेक्टची सुरूवात केली. आयस्कूलकनेक्ट स्कॉलरशिप त्याच दृष्टिकोनाचा भाग आहे. आम्ही इच्छुकांना सांगू इच्छितो की ते या प्रवासामध्ये एकटे नाहीत, आमचा त्यांना पाठिंबा आहे आणि त्यांच्या महत्त्वाकांक्षांवर विश्वास आहे.’’
आशिष पुढे म्हणाले, “विशेषतः मध्यम आणि निम्न-उत्पन्न कुटुंबातील विद्यार्थ्यांना त्यांचे आर्थिक व्यवस्थापन करणे कठीण आहे. तसेच सध्याच्या विनिमय दरातील चढउतारांमुळे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांच्या अडचणीत भर पडत आहे, जे तूट भरून काढण्यासाठी धडपडत आहेत. आम्हाला आमच्या स्कॉलरशिपमुळे काही विद्यार्थ्यांना परदेशात जाण्यास मदत करू शकलो, याचा आनंद होत आहे.’’
२०२० मध्ये लॉन्च करण्यात आलेल्या आयस्कूलकनेक्ट स्कॉलरशिपच्या पहिल्या पर्वामध्ये पदेशात शिक्षण घेण्याची इच्छा असलेल्या १५ इच्छुकांना स्कॉलरशिप्स दिल्या. यावर्षी २९ ऑक्टोबर २०२२ रोजी स्कॉलरशिप विजेत्यांचा सत्कार करण्यासाठी व्हर्च्युअली समारंभ आयोजित करण्यात आला होता. स्कॉलरशिपच्या अव्वल विजेत्यांपैकी एक डार्टमाउथ कॉलेज, यूएसएमध्ये प्रवेश घेतलेल्या शिवांगी टंडनला रोख पारितोषिक मिळाले.