पत्नीचे परपुरुषासोबत फोटो पाहिले; रागाच्या भरात ३ मुलांचा चिरला गळा


स्थैर्य, वसई, दि. २९ : नालासोपारा पूर्वेच्या डॉन लेन परिसरात राहणाऱ्या एका पित्याने शनिवारी रात्री तीन लहान मुलांची हत्या करून आत्महत्या केली. पत्नीचे परपुरुषासोबत छायाचित्र पाहून रागाच्या भरात त्याने हे पाऊल उचलले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

नालासोपारा पूर्वेच्या डॉन लेन परिसरातील बाबूल पाडा येथे विजू परमार (४०) हे नयन परमार (१२), नंदिनी परमार (८) आणि नयना परमार (३) या तीन अपत्यांसह राहत होते. कैलास यांची पत्नी गेल्या सहा महिन्यांपासून माहेरी निघून गेली होती. यानंतर ते तीन मुलांसह एकटे राहत होते. कैलास याच्या घरापासून काही अंतरावर राहणाऱ्या वडील विजू परमार यांनी शनिवारी सायंकाळी कैलासला चहा पिण्यासाठी फोन केला होता. मात्र त्याने नकार दिल्याने रात्री नऊच्या सुमारास विजू परमार हे त्याच्या घरी पोहोचले. तेव्हा ते दार उघडत नसल्यामुळे त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा उघडला. त्यावेळी या सर्वांवर चाकूने वार झाल्याचे आणि सर्व मृतावस्थेत दिसून आले. तीनही मुलांचा गळा चिरल्यानंतर कैलास याने स्वत:वरही चाकूने वार करून आत्महत्या केल्याची माहिती तुळींज पोलिसांनी दिली. कैलास यांचे वडील विजू परमार यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!