दैनिक स्थैर्य | दि. ९ जानेवारी २०२५ | फलटण |
क्रांतिज्योती सावित्रीमाई यांचे राष्ट्रीय सेवावृत्तीचे कार्य नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. गर्भातील मुली ते वयातील कन्या सुरक्षित ठेवण्यासाठी संस्कार अन् सावित्रीमाईच्या विचारांची गरज आहे. चांगले-वाईट स्पर्शज्ञान शिकवणारी सावित्रीमाई घराघरात हवी आहे, असे प्रतिपादन कथाकार, प्रबोधनकार प्रा. रवींद्र कोकरे यांनी केले.
४५ एकर जमीन त्वरित विकणे आहे
फलटण - सातारा रोडवर मलवडी गावाच्या
रस्त्यालगत, निसर्गरम्य, वीज, पाणी असलेली
प्रदूषणमुक्त ४५ एकर जमीन योग्य किमतींस
त्वरित विकणे आहे.
संपर्क : 8888006611 (WhatsApp)
संत सावतामाळी तरुण मंडळ तिरकवाडी (फलटण) येथे क्रांतिज्योती सावित्रीमाई व्याख्यानमालेच्या शुभारंभप्रसंगी प्रमुख व्याख्याते म्हणून प्रा. कोकरे बोलत होते. १९४ व्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले जयंतीनिमित्त आदिती पिसे, प्रणिती शिंदे, दिपाली धोटे या तिन्ही मुलींनी सावित्रीमाईंवर ओव्या गायन, भाषण खूप चांगल्या पद्धतीने करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
घराघरात सावित्रीच्या विचारांची गरज आहे. सत्यवान सावित्रीच्या पुराणकथेपेक्षा महात्मा फुले व सावित्रीमाई यांच्या वास्तवतेचे जनजागरण होणे आवश्यक आहे. मुला-मुलींत भेदभाव न करता दोन्हींना ही समानतेची वागणूक, शिकवण, संस्कार देणे महत्त्वाचे आहे, असे प्रा. कोकरे यांनी यावेळी सांगितले.
प्रा. कोकरे सरांनी व्याख्यानांमधून सावित्रीमाईंचे चरित्र अन् चारित्र्य अगदी सहजपणे साध्या-सोप्या भाषेत व्यक्त करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. सूत्रंचालन गजानन बोराटे यांनी केले. व्याख्यानास मोठ्या प्रमाणात मुली, महिला व नागरिक उपस्थित होते.