दैनिक स्थैर्य । दि. २९ ऑगस्ट २०२२ । सातारा । रयत शिक्षण संस्थेचे छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथील इतिहास विभागाच्या वतीने ‘भारतीय स्वातंत्र्य व छत्रपती शिवाजी कॉलेजच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त’ शुक्रवार, दिनांक २६ ऑगस्ट२०२२ रोजी लेजर प्लेस येथे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध प्रबोधनकार, टीव्ही स्टार श्री. सत्यपाल चिंचोलीकर यांच्या वैज्ञानिक व तर्कशुद्ध विचारांवर आधारित ‘सत्यपाल की सत्यवाणी’ या सांस्कृतिक/प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर साहेब यांनी मौलिक अशा सूचना दिल्या. त्यांनी केलेल्या योग्य त्या मार्गदर्शनानुसार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या प्रारंभी कार्यक्रम समन्वयक प्रा.चिंदे एम. डी. यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून प्रमुख सादरकर्ते श्री. सत्यपाल चिंचोलीकर व त्यांच्या सर्व सहकारी कलाकारांची ओळख करून दिली. त्यानंतर उपप्राचार्या डॉ. रोशनआरा शेख आणि इतिहास विभाग प्रमुख प्रो.(डॉ.) धनाजी मासाळ यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे ग्रंथ व बुके देऊन स्वागत केले.
स्वागत समारंभानंतर श्री. सत्यपाल चिंचोलीकर यांनी आपल्या अमोघ वाणीने छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील, संत गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज या सारख्या महामानवांच्या
विचारांचा वारसा जोपासण्याची आवश्यकता सांगितली व आपल्या प्रबोधनातून सर्वाना मंत्रमुग्ध केले. वर्तमानकालीन सद्यस्थितीत आपल्या आसपास घडणाऱ्या अनेक अनिष्ट चालीरीती-रूढी-परंपरा, अंधश्रद्धा, भानामती, जादूटोणा, बुवाबाजी, वाढता भ्रष्टाचार यासारख्या घटनांचा दाखला देत सर्व विद्यार्थ्यांना विचारप्रवण करण्याचे, त्यांच्यात नैतिक मुल्ये जोपासण्याचे काम केले. शिवाय स्त्री-पुरुष समानता, लिंगभेद समानता यावरही परखड भाष्य करून भारतीय राज्यघटनेची सर्वोच्चता व धर्मनिरपेक्षता या संकल्पनाचे महत्व अधोरेखित
केले. या कार्यक्रमासाठी हार्मोनिअम वादक श्री. गजानन चिंचोलीकर यांनी त्यांना सुरेख अशी संगीत साथ दिली. तर श्री. पियुषपाल यांनी तबल्यावरती साथ केली. तसेच श्री. राजेश काईंगे, श्री.सुनील चिंचोलीकर यांनीही या कार्यक्रमासाठी त्यांना कलाकार म्हणून साथ दिली. याच कार्यक्रमामध्ये महाविद्यालयातील काही विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी या कार्यक्रमप्रसंगी तबलावादन व गौळणीचे बहारदार सादरीकरण केले. कार्यक्रमाच्या शेवटी इतिहास विभाग प्रमुख प्रो.(डॉ.) धनाजी मासाळ यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले. सदर कार्यशाळा यशस्वीरीत्या संपन्न होण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर साहेब यांनी बहुमोल मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रो. (डॉ.)अनिलकुमार वावरे, उपप्राचार्या डॉ. रोशनआरा शेख, उपप्राचार्य डॉ. रामराजे माने- देशमुख यांनीही आवश्यक त्या मार्गदर्शक सूचना दिल्या. इतिहास विभाग प्रमुख प्रो. डॉ. डी. बी. मासाळ, रुसा योजनेचे समन्वयक डॉ. सुभाष कारंडे, इतिहास विभागातील सर्व सहकारी प्राध्यापक डॉ. आर.व्ही.कुंभार, प्रा. एम. एस. निकम, डॉ. व्ही. एस. येलमार, डॉ. डी. डी. कोरडे, प्रा. के. एस. वाघमारे, प्रा. एस. टी. ठोकळे, प्रा. सौ. एस.व्ही. कदम व प्रा. सौ. एम. एम. गोडसे तसेच इतिहास विभागातील विद्यार्थी, महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थी, महाविद्यालयातील प्रशासकीय सेवक या सर्वांच्या बहुमोल सहकार्यातून सदरचाकार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.