सतीश कौशिक यांनी सशक्त अभिनयाने अनेक भूमिका अजरामर केल्या – राज्यपाल रमेश बैस

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । १० मार्च २०२३ । मुंबई । राज्यपाल रमेश बैस यांनी अभिनेते, दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

“प्रसिद्ध चित्रपट व नाट्य अभिनेते, निर्माता, दिग्दर्शक, पटकथा लेखक व हास्य अभिनेते सतीश कौशिक यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक आहे. एक मनस्वी कलाकार आणि विचारशील दिग्दर्शक असलेल्या सतीश कौशिक यांनी आपल्या सशक्त अभिनयाने अनेक भूमिका अजरामर केल्या आणि राष्ट्रीय पुरस्कारांवर नाव कोरले. जवळपास चार दशके त्यांनी केलेली चित्रपट व रंगभूमीची सेवा कधीही विसरली जाणार नाही. श्री. कौशिक यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व आपल्या शोकसंवेदना त्यांच्या कुटुंबियांना कळवतो,” असे राज्यपाल बैस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.


Back to top button
Don`t copy text!