दैनिक स्थैर्य | दि. ९ जून २०२४ | फलटण |
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून फलटण तालुका व तालुक्याला पाणीपुरवठा करणार्या धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडत आहे. या पावसामुळे शेतकरी पेरणीच्या कामाला लागले असून शासनाच्या कृषी क्षेत्रानेही खरीप हंगामाचे नियोजन केले असून त्याप्रमाणे कृषी विभागही कामाला लागला आहे.
नीरा उजवा कालवा विभागात आज, रविवार, दि. ९ जून रोजी सकाळी संपलेल्या २४ तासात झालेला पाऊस खालीलप्रमाणे –
- भाटघर – ६३ मि.मी.
- नीरा देवघर – ५४ मि. मी.
- वीर – – ५२ मि. मी.
- गुंजवणी – २७ मि. मी.
- फलटण – ७५ मि. मी.
- निंबळक – ६३ मि. मी.
- धर्मपुरी – ९२ मि. मी.
- नातेपुते – ५५ मि. मी.
- माळशिरस – ६६ मि. मी.
दरम्यान, भाटघर धरणाचा आजचा पाणीसाठा १.४३ टीएमसी, ६.०६ टक्के इतका असून गतवर्षी या तारखेला १.४० टीएमसी ५.९८ टक्के पाणीसाठा होता.
नीरा – देवघरचा आजचा पाणीसाठा ०.९७ टीएमसी ८.३२ टक्के असून गतवर्षी या तारखेला १.०८ टीएमसी म्हणजे ९.२२ टक्के इतका पाणीसाठा होता.
वीर धरणाचा आजचा पाणीसाठा १.८३ टीएमसी १९.४० टक्के असून गतवर्षी या तारखेला २.१९ टीएमसी म्हणजे २३.३७ टक्के पाणीसाठा होता.
गुंजवणीचा आजचा पाणीसाठा ०.४९ टीएमसी, १३.३० टक्के असून गतवर्षी या तारखेला ०.६४ टीएमसी १७.३४ टक्के पाणीसाठा होता.