पूरग्रस्तांना मदत करत सातारचा शाही दसरा सोहळा उत्साहात


सातारा – येथील जलमंदिर येथे श्री भवानी तलवारीचे पूजन करताना श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले शेजारी वेदमूर्ती उपेंद्रशास्त्री धांदरफळे.


स्थैर्य, सातारा, दि. 4 ऑक्टोबर : येथील खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केलेल्या पूरग्रस्तांना मदत करा आव्हानाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत दरवर्षीप्रमाणे होणारा दसर्‍याचा शाही सिमोल्लंघन सोहळा तसेच दसर्‍याचा सोने लुटण्याचा कार्यक्रम अतिशय शांत स्वरूपात पार पडला. राजघराण्याच्या वतीने जलमंदिर येथे छत्रपती शिवरायांचे थेट तेरावे वंशज श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी जल मंदिरात गर्भगृहात श्री भवानी तलवारीचे वेदमंत्राच्या जयघोषात पूजन केले वेदमूर्ती उपेंद्र शास्त्री धांदरफळे व वेदमूर्ती नांदेडकर यांनी या पूजा सोहळ्याचे पौरोहित्य केले. त्यानंतर सुशोभित केलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर भवानी तलवार ऐतिहासिक आणि पारंपारिक वेशभूषा परिधान केलेल्या मावळ्यांच्या सोबत आणि सिंग तुतार्‍यांच्या निनादात सनई चौघडे च्या मंगल सुरात मिरवणूक काढण्यात आली .

जलमंदिरापासून ही मिरवणूक पवई नाका येथे शिवतीर्थ परिसरात पोहोचल्यावर सायंकाळी या भवानी तलवारीचे पूजन छत्रपती घराण्याचा वतीने उदयनराजे भोसले यांनी केले याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .त्यानंतर जलमंदिर येथे सोने लुटण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही आपल्या सुरू बंगल्यात सायंकाळी मान्यवरांना सोने देऊन हा विजयादशमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला

सायंकाळ नंतर शहरातील प्रमुख दुर्गामाता मंडळाच्या दुर्गा मातांच्या मूर्तींचे विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला .पहाटे तीन वाजेपर्यंत हा विसर्जन सोहळा मोठ्या उत्साहात रंगला होता. ढोल ताशांचे गजर रात्री बारापर्यंत सुरू होते. पोलिसांनी यासाठी विशेष चूक बंदोबस्त ठेवला होता तसेच शहरातील प्रमुख विसर्जन मिरवणूक मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवले होते. रिमझिम पावसाच्या सरीत हा विसर्जन सोहळा देवी भक्तांनी मोठ्या उत्साहात संपन्न केला .


Back to top button
Don`t copy text!