
स्थैर्य, फलटण : साताऱ्याची ओळख बनलेली आणि खवैय्यांच्या जीभेवर रेंगाळणारी ‘देवत्व बेकर्स’च्या सुप्रसिद्ध मावा केकची चव आता फलटणकरांना चाखता येणार आहे. येत्या स्वातंत्र्य दिनी, १५ ऑगस्ट रोजी, येथील भक्ती एंटरप्रायजेसमध्ये ‘देवत्व’च्या उत्पादनांच्या विक्रीचा शुभारंभ होत आहे.
‘देवत्व बेकर्स’चा ड्रायफ्रूटने समृद्ध असलेला शुद्ध शाकाहारी मावा केक केवळ साताऱ्यातच नव्हे, तर मुंबई, पुणे, बंगळूरुसह दुबई, कॅनडा अशा परदेशातही लोकप्रिय आहे. सर्वसामान्य ग्राहकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी या चवीला पसंती दिली आहे, असे देवत्व बेकर्सच्या मालक अस्मिता पाटील यांनी सांगितले.
आता हा ‘स्वादोत्सव’ फलटणमध्ये साजरा होणार असल्याने रामनगरीतील खवैय्ये खूश होतील, असा विश्वास भक्ती एंटरप्रायजेसचे प्रोप्रायटर तथा पत्रकार यशवंत खलाटे-पाटील यांनी व्यक्त केला. त्यांचे हे दालन राममंदिराशेजारी, कसबा पेठेतील बुरुड गल्ली येथे सुरू होत असून, नागरिकांनी शुभारंभाला उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
‘राजपुरोहित’चे नमकीनही मिळणार
मावा केकसोबतच, साताऱ्यातील सुप्रसिद्ध ‘राजपुरोहित’ यांची फरसाण, बाकरवडी, पोहा चिवडा आणि लसूण शेव यांसारखी नमकीन उत्पादनेही प्रथमच फलटणमध्ये भक्ती एंटरप्रायजेस येथे विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत.