कुंटणखाना चालणार्‍या महामार्गावरील लॉजवर सातारा पोलिसांची धाड; तीन तरुणींची सुटका


दैनिक स्थैर्य | दि. २६ जुलै २०२३ | सातारा |
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या ‘मलबार लॉजिंग अँण्ड बोर्डिंग’ या लॉजवर सुरू असणार्‍या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी धाड टाकून तीन तरुणींची सुटका केली. ही कारवाई दि. २४ रोजी दुपारी ४.३० वाजता करण्यात आली. या प्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात तिघांवर मानवी अनैतिक व्यापार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गौतम परमेश्वर काकडे (वय २८, रा. लातूर), जय अमर कांबळे (वय २०, रा. प्रतापसिंह नगर, सातारा) व अन्य एकावर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मलबार लॉजवर वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तेथे धाड टाकली. त्यावेळी नवी मुंबईतील तीन तरुणींची पोलिसांनी सुटका केली. या तरुणींना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले जात होते.

या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक अनिता मेणकर-आमंदे अधिक तपास करीत आहेत.


Back to top button
Don`t copy text!