सातारा-पंढरपूर एसटी बस दरोडेखोरांचा कब्जा; दगडफेकीत चालक जखमी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, पंढरपूर, दि.२०:  सातारा-पंढरपूर एसटी बसवर दरोडेखोरांनी ताबा मिळवल्यानं एकच खळबळ उडाली. माळशिरसजवळील पिलीव घाटात सातारा-पंढरपूर एसटीवर पहिल्यांदा दगडफेक करण्यात आली. त्यानंतर दहा ते पंधरा जणांच्या टोळक्यानं गाडी थांबवत त्यावर ताबा मिळवला, तसेच एसटीतील लोकांना मारहाणसुद्धा करण्यात आलीय. या दगडफेकीत एसटीचा चालक जखमी झाल्याचे समजते. पंढरपूरमधून साताऱ्याकडे एसटी जात असताना ही घटना घडलीय. पंढरपूर-सातारा रस्ता दोन्ही बाजूंनी बंद करण्यात आला आहे.


Back to top button
Don`t copy text!