स्थैर्य, सातारा, दि. ३१ : दिनांक १५ / ०६ / २०१ ९ रोजी सुमारे एक वर्षापूर्वी खटाव तालुका औंध पोलीस ठाणे हद्दीत पुसेसावळी गावामध्ये रात्रीच्या सुमारास मोठा धाडसी दरोडा टाकून हॉटेल चालक महिलेस व तिच्या पतीस मारहाण करून ४५०००/- सोन्या चांदीचे दागिणे व ८००००/- रु रोख रक्कम असा मुद्देमाल जबरीने धाक दाखवून चोरून नेला होता. तसेच पुसेसावळी गावामध्ये दोन ठिकाणी दरोडेखोरांनी घरामध्ये लोक झोपले असताना कुऱ्हाड, टिकावाच्या सहाय्याने दरवाजा तोडून गावातील लोकांवर दहशत माजवून दरोडे टाकण्याचे प्रयत्न करून दरोडा टाकून परजिल्ह्यात पसार झालेले होते. म्हणून औंध पोलीस ठाणे गुरनं ७४ / २०१ ९ भा.द.वि.क. ३ ९ ५ . ५११ प्रमाणे गुन्हा दाखल होता . सदर धाडसी दरोडयातील काही आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा , सातारा यांनी अल्पावधीतीच भिवंडी जि.ठाणे येथून शिताफीने ताब्यात घेवून गुन्हयात अटक केली होती . या गुन्हयास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कायदा (मोक्का) अन्वये कारवाई केलेली होती. तेजस्वी सातपूते पोलीस अधीक्षक, सातारा तसेच धीरज पाटील अपर पोलीस अधीक्षक, सातारा यांनी सर्जेराव पाटील पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांना सदर गुन्हयातील इतर आरोपींना अटक करणेबाबत मार्गदर्शनपर सुचना दिलेल्या होत्या . पुसेसावळी येथील धाडसी दरोडयातील काही आरोपी गुन्हा घडल्यापासून स्वतःची अटक चुकवत सोलापूर, अ.नगर, पुणे येथील त्यांच्या नातेवाईकांकडे राहत लपत फिरत होते. पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांना बातमी मिळाली की, मोक्क्याच्या गुन्हयातील महत्वाचा आरोपी हा फडतरवाडी (नेर) परिसरात नातेवाईकांना भेटण्याकरिता येणार असून त्यास ताब्यात घेण्याकरिता पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न ज-हाड यांचे अधिपत्याखाली एक स्वतंत्र पथक नेमून अटक करणेबाबत सूचना दिल्या होत्या.
दिनांक २ ९ / ०७ / २०२० रोजी पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न ज-हाड व त्यांचे पथक सदर परिसरामध्ये पेट्रोलिंग करीत असताना सदर आरोपी येणार असलेल्या परिसरामध्ये संपुर्ण पथक स्वतःची ओळख लपवून गुराखी व शेतक-यांच्या वेशात वेशांतर करून नेर तलाव परिसरामध्ये दिवसभर सापळा लावून थांबून होते. दरोडयातील महत्वाचा आरोपी हा परिसरात आला असता त्याला पथकाने शिताफीने व चपळाईने ताब्यात घेवून त्याचेकडे विचारपूस केली असता सदर गुन्हयाबाबत त्यांनी संपुर्ण माहिती पथकाला दिली असून त्यास औंध पोलीस ठाणे गुरनं ७४/२०१९ भा.द.वि.क ३९५, ५११, सह महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रति. का.क. ३(१) (२) ३ (२) ३ (४) या गुन्हयाच्या पुढील तपासकामी औंध पोलीस ठाणेकडे वर्ग केले आहे.