सातारा जिल्हा एकल प्रा. शिक्षक सेवा मंच अंतर्गत महिला आघाडी स्थापन


 

स्थैर्य, फलटण दि. १३ : सातारा जिल्हा एकल प्रा. शिक्षक सेवा मंच महिला विभाग अध्यक्षपदी सौ. मनीषा सुनील महाडीक (स्वामीनगर, ता. सातारा), सरचिटणीस पदी सौ. मेघा हणमंत चव्हाण (कुडाळ, ता. जावली), कार्याध्यक्षपदी सौ. रिता सुरेश मारुडा (मुंजवडी, ता. फलटण) यांची नियुकी करण्यात आली असून त्याशिवाय अन्य पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांची नियुक्तीही करण्यात आली आहे.

सातारा जिल्हा एकल प्रा. शिक्षक सेवा मंचच्या पदाधिकारी यांची जिल्हाध्यक्ष विकास खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाइन मिटिंग रविवारी संपन्न झाली, या मिटिंगमध्ये महिला विभागाची स्वतंत्र कार्यकारिणी व पदाधिकारी असावेत अशी मागणी झाल्यानंतर सकारात्मक निर्णय होऊन सातारा जिल्हा महिला विभाग स्थापन करुन जिल्हाध्यक्ष विकास खांडेकर यांनी पदाधिकारी नियुक्ती जाहीर केली.

अन्य पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य खालीलप्रमाणे – कोषाध्यक्ष सौ. पल्लवी केशवराव भोसले (म्हातेकरवाडी, ता. वाई), सहचिटणीस सौ. अर्चना सुरेश कांबळे (दानवली, ता. महाबळेश्वर), कार्यालयीन चिटणीस सौ. स्वाती सतीश साळवे (गेंदवाडा, ता. माण), प्रसिद्धी प्रमुख सौ. राजश्री महादेव पोतदार (कोळे, ता. कराड), संपर्क प्रमुख सौ. मंदाकिनी हरिभाऊ शितोळे (जांभुळणी, ता. माण), जिल्हा उपाध्यक्ष सौ. स्वाती काशीनाथ सुतार (गाडखोप, ता. पाटण), ज्येष्ठ मार्गदर्शिका म्हणून सौ.अरुणा विठ्ठल कुरपड (लोणंद, ता. खंडाळा) यांची नियुक्ती करण्यात आली.

महाराष्ट्र राज्य एकल प्रा. शिक्षक सेवा मंच अध्यक्ष लक्ष्मणराव नरसाळे, कार्याध्यक्ष हुसेन बारस्कर, राज्य सरचिटणीस प्रवीण शेरकर, कोषाध्यक्ष पवन सुर्यवंशी, उपाध्यक्ष नंदकुमार दंडिले, राज्य संघटक लक्ष्मण नरवडे, सातारा जिल्हाध्यक्ष विकास खांडेकर व जिल्ह्यातील अन्य पदाधिकारी, सदस्य यांनी नवनियुक्त महिला आघाडी पदाधिकारी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!