सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक सेलची फलटणचे प्रांताधिकार्‍यांशी समाजाच्या विविध प्रश्नांबाबत चर्चा


दैनिक स्थैर्य | दि. २९ मार्च २०२३ | फलटण |
सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक सेल विभागाच्या वतीने फलटणचे प्रांताधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी श्री. शिवाजीराव जगताप साहेब यांच्याशी मुस्लिम समाजाच्या जातीच्या दाखल्यासंदर्भात तसेच समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.

यावेळी सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक सेल विभागाचे जिल्हाध्यक्ष शफिक भाई शेख, जिल्हा उपाध्यक्ष सिकंदर भाई डांगे, फलटण तालुकाध्यक्ष आबिद भाई खान, फलटण शहराध्यक्ष जमशेद भाई पठाण व इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

फलटणचे प्रांताधिकारी श्री. जगताप यांनी सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक सेलला चर्चेदरम्यान त्यांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांवर समाधानकारक तोडगा काढण्याचे आश्वासन देऊन त्यांचे प्रश्न शासन दरबारी पोहोचविणार असल्याचे म्हटले आहे.


Back to top button
Don`t copy text!