जिल्ह्याची वाटचाल पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने ? जिल्ह्यात सर्व मार्केट, दुकाने सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेमध्येच चालु ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश; नागरिकांनो आता तरी नियम पाळा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा : सातारा जिल्ह्यातील सर्व मार्केट, दुकाने सकाळी 9.00 वा. ते सायंकाळी 5.00 वा. या वेळेमध्ये चालु राहतील असा आदेश पारीत करण्यात आला होता. त्या कारणास्तव विनाकारण लोक बाहेर फिरत असल्याचे निदर्शनास येत असल्याने, त्यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने सातारा जिल्ह्यात सर्व मार्केट, दुकाने सुरु ठेवण्याचा कालावधी कमी करणे आवश्यक असल्याने जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 मधील तरतूदीनुसार प्राप्त असलेल्या अधिकारान्वये दि. 9.7.2020 रोजीच्या 17.00 वाजल्या पासून ते  दि. 31.7.2020 रोजीच्या 24.00 वाजेपर्यंत खालील प्रमाणे आदेश निर्गमित केलेले आहेत. सातारा जिल्ह्यामध्ये कोरोनाने आपले हातपाय पसरले असून आता नागरिकांनी स्वतःची स्वतः काळजी घेणे, हे अत्यंत महत्वाचे आहे. म्हणजे करोनाच्या बाबतीत आपण स्वतः आत्मनिर्भर होणे एवढेच आपल्या हातात असून आगामी काळामध्ये करोनाची लस उपलब्ध होईपर्यंत तरी शासनाने दिलेल्या सर्व मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे एवढेच आता नागरिकांच्या हातात आहे. सातारा जिल्ह्यामध्ये सूज्ञ नागरिक असून काही हुल्लडबाजी करणाऱ्यां मुळे करोना हा आजार नागरिकांच्या घरातपर्यंत पोहचू शकतो. आता तरी नागरिकांनी शासनाच्या दिलेल्या सूचनांचे पालन करून अनावश्यक गर्दी टाळणे खूप आवश्यक आहे. गरज नसेल तर श्यक्यतो घराबाहेर न पडता घरात राहूनच आपली कामे करावीत. आता सर्व नागरिकांनी शासनाने दिलेले नियम म्हणजेच सुरक्षित अंतर ठेवणे, बाहेर पडल्यावर चेहऱ्यावर मास्क वापरणे व वारंवार हात धुणे हे नियमितपणे केले पाहिजे. त्याशिवाय नागरिकांकडे दुसरा कोणताही पर्याय उरणार नाही व जर पेशंट वाढले, तर त्याचा सर्वच घटकांना मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे आता नागरिकांनी कोरोना या आजाराची काळजी घेऊनच आपले दैनंदिन व्यवहार करणे गरजेचे आहे.  अथवा पुन्हा लॉकडाऊन करण्याशिवाय कोणताही पर्याय शासनासमोर उरणार नाही.

सातारा जिल्ह्यात सर्व मार्केट, दुकाने सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेमध्येच चालु राहतील. कंटेन्मेंट झोनमध्ये संबंधित उपविभागीय अधिकारी तथा इन्सिडंट कमांडर यांचे आदेश लागू राहतील. सातारा जिल्ह्यात लग्नविधी यासारख्या कार्यक्रमास जास्तीत जास्त 20 पर्यंत व्यक्तींना सामाजिक अंतर ठेऊन कार्यक्रम करण्यास परवानगी असून यामध्ये या कार्यक्रमासाठी जिल्ह्याबाहेरील वधु,वर, वधु-वरांचे आई-वडील, सख्खे भाऊ-बहिण, सख्खे आजी-आजोबा यांना उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात येत आहे.

या आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधितांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांचे विरुध्द यथास्थिती आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51, भारतीय साथरोग अधिनियम 1897 व भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 नुसार दंडनीय, कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!