सातारा शहर शिवसेनेच्या वतीने घरपट्टी व पाणीपट्टी माफ करण्याची मागणी


स्थैर्य, सातारा, दि. 20 : सातारा शहर शिवसेनेच्या वतीने सातारा नगर पालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे यांना निवेदन देण्यात आले. सध्या संपूर्ण जगभरात कोरोनाचे थैमान चालू आहे. त्यासाठी सलग 4 लॉकडॉऊन केल्याने सर्व जनता आर्थिक दृष्ट्या त्रासली आहे. नोकरदार, छोटे दुकानदार, मजूर, चाकर, उद्योगधंदेवाले, हातावर पोट असणारे कामगार या सर्वांचे खूप आर्थिक नुकसान झाले आहे. दोन महिन्यात जवळचे पैसे संपले आहे. इथून पुढे जगावे कसे असा प्रश्न उभा आहे. त्यातच आता नगरपालिकेची वार्षिक घरपट्टी व पाणीपट्टी यांची नोटीस लोकांना जातील तेव्हा आम्ही सातारा शहर शिवसेनेच्या वतीने विनंती करतो की सन 2019-2020 ची घरपट्टी व पाणीपट्टी आपण नगरपालिका हद्दीतील 1000 चौ.फूटाच्या आतील मिळकती धारकांचे चालू वर्षाची घरपट्टी व पाणीपट्टी माफ करावी व नागरिकांना दिलासा द्यावा आशा मागणीचे निवेदन सातारा शहर शिवसेनेचे शहर प्रमुख बाळासाहेब शिंदे, उपशहर प्रमुख शिवाजीराव इंगवले यांनी दिले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!