साताऱ्यात ४ व ५ एप्रिलला ‘अमृतपेठ थेट बाजारपेठ’ प्रदर्शन


स्थानिक लघुउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी साताऱ्यातील राजवाडा येथे ४ आणि ५ एप्रिल रोजी ‘अमृतपेठ थेट बाजारपेठ’ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

 स्थैर्य, सातारा, दि. ३० मार्च : महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे साताऱ्यात ‘अमृतपेठ थेट बाजारपेठ’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत ४ आणि ५ एप्रिल रोजी राजवाडा येथील महिला मंडळ हॉलमध्ये भव्य प्रदर्शन आणि स्टॉल विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे.

लघुउद्योजकांना हक्काची बाजारपेठ

स्वदेशी तसेच स्थानिक लघुउद्योजकांना प्रोत्साहन देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या माध्यमातून स्थानिक उत्पादकांना ‘अमृतपेठ’ या ई-कॉमर्स ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आणि प्रत्यक्ष प्रदर्शनाद्वारे मोठी बाजारपेठ उपलब्ध करून दिली जात आहे.

दोन दिवस उत्पादनांची थेट विक्री

हे प्रदर्शन दोन्ही दिवस सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत नागरिकांसाठी खुले राहणार आहे. या प्रदर्शनामध्ये विविध लघुउद्योजक, बचतगट आणि स्थानिक उत्पादक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. त्यांच्या विविध दर्जेदार उत्पादनांची येथे थेट विक्री केली जाणार असून, सातारकरांना स्थानिक व स्वदेशी वस्तू खरेदी करण्याची उत्तम संधी यातून मिळणार आहे.


Back to top button
Don`t copy text!