स्थैर्य, फलटण : कोरोना या रोगाचा प्रादुर्भाव देशासह राज्यात झपाट्याने वाढत आहे. सातारा जिल्हा सुद्धा याला अपवाद नाही. जिल्ह्यातील परिस्थिती भयानक कोरोना रुग्णांची आकडेवारी एक हजारच्या वरती गेली आहे. या सर्व महामारीत आशा सेविका, अंगणवाडी सेविका, डाॅक्टर, पोलीस, शासकीय अधिकारी, कर्मचारी योद्धाची भूमिका निभावत आहेत. अश्या परिस्तिथी मध्ये दुधेबावी ता. फलटण येथील घरोघरी आरोग्य सर्वेक्षण करणार्या आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांना माणुसकीच्या नात्याने विधानपरिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या सूचनेनुसार सर्वज्ञ एंटरप्रायझेसचे सर्वेसर्वा रघुनाथ नाळे यांच्या शुभहस्ते आरोग्य अधिकारी अहिवळे यांच्या कडे आशा वर्कर, आरोग्य सेविका, मदतनीस यांना आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे असणारे N95 चे मास्क मोफत दिलेले आहेत. सर्वज्ञ एंटरप्रायझेसने आरोग्य विषयक महत्वाचे असणारे मास्क मोफत दिल्याबद्दल आशा सेविका, अंगणवाडी सेविका तसेच सर्व ग्रामस्थांनी सर्वज्ञ एंटरप्रायझेस प्रशांत रघुनाथ नाळे यांचे आभार मानले आहेत. सर्वज्ञ एंटरप्रायझेसचे प्रशांत नाळे यांचा इंडस्ट्रीज सेफ्टी मटेरिअल सप्लाय गेली पाच वर्षापासूनचा व्यवसाय आहे. सर्वज्ञ एंटरप्रायझेस यांनी अल्पावधीतच सेफ्टी मटेरिअल व्यवसाय मध्ये उद्योजकांची लोकप्रियता मिळवली आहे. कोरोना काळात सर्वज्ञ एंटरप्रायझेस यांनी व्यवसायच्या दृष्टीने नव्हे तर माणुसकी जपत अत्यल्प दरामध्ये सेफ्टी प्रॉडक्ट्स उपलब्ध करून देत आहेत.