उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटेंचा सार्थ अभिमान; श्रीमंत रधुनाथराजेंची फेसबुक पोस्ट

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि. १८: सध्या फलटण तालुक्यामध्ये कोरोनाचा फैलाव वाढत असताना फलटण नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे यांनी आपल्या सजाई मंगल कार्यालय येथे १०० बेड्स हे तयार करून दिल्याबद्दल त्यांचा सार्थ अभिमान आहे. आगामी काळात सुद्धा नंदकुमार भोईटे हे फलटणकरांच्या सेवेसाठी कायम तयार असतील, असा मला विश्वास आहे. असे प्रतिपादन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी फेसबुक पोस्ट केलेले आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की, फलटण मध्ये असणाऱ्या आरोग्य यंत्रणेवर आता ताण येवु लागला आहे. फलटण मध्ये सध्या बेड्स मिळणे सुद्धा अवघड झालेले आहे. हे जाणूनच फलटणकरांच्या मदतीला उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे हे धावून आलेले आहेत. नंदकुमार भोईटे यांच्या असणाऱ्या सजाई गार्डन मंगल कार्यालयात नंदकुमार भोईटे यांनी स्वखर्चाने १०० बेड्स असलेले कोरोना केअर सेंटर उभारून प्रशासनाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

या बाबत उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे म्हणाले की, सध्या फलटण शहरासह तालुक्यामध्ये साधारण दररोज १०० ते २०० रुग्ण हे कोरोनाबधित म्हणून आढळून येत आहेत. कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्रशासनाला सध्या जागेची व बेड्सची कमतरता मोठ्या प्रमाणावर जाणवत होती. हे लक्षात घेता सजाई गार्डन मंगल कार्यालय येथे १०० बेड्स तयार करून लवकरच प्रशासनाकडे हस्तांतरीत करणार आहे. भविष्य काळात गरज पडली तर सजाई गार्डन येथेच अजून बेड्स आपण उपलब्ध करून देणार आहोत.


Back to top button
Don`t copy text!