
दैनिक स्थैर्य । दि. 22 जुन 2025 । सातारा । कलेढोण सरपंच सौ.प्रीती शेटे यांनी विभागीय आयुक्तच्या अपात्र करण्याचा निर्णय विरुद्ध महाराष्ट शासन ग्रामविकास विभागाकडे अपील दाखल केले होते. सरपंच अपात्र करण्याचा निर्णयाला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी 18 जून रोजी स्थगिती दिली. यामुळे पुन्हा. कलेढोण मध्ये सरपंच पदी सौ.प्रीती शेटे यांनी पदभार स्वीकारला.
कलेढोण ग्रामपंचायत निवडणूक झाल्यापासून गेली साडेचार वर्षात विविध राजकीय घडामोडी घडल्या.या साडेचार वर्षाच्या कालावधी मध्ये सरपंच प्रीतीताई शेटे यांनी सलग तीन वेळा पदभार स्वीकारला.मागील निवडणुकीमध्ये ग्रामविकास आघाडी मध्ये अॅड. शरदचंद्र भोसले, सुरेशशेठ शिंदे, सोमनाथ शेटे यांनी एकत्र येऊन ग्रामपंचायत वर सत्ता स्थापित केली होती. यावेळी सरपंच म्हणून सौ प्रीतीताई शेटे यांची एकमताने निवड झाली. त्यानंतर दोन वर्ष सरपंच पदी प्रीतीताई शेटे यांनी कारभार पाहिला. दोन वर्षानंतर त्यांनी स्वगृही हनुमान पॅनल मध्ये प्रवेश केला आणि पुन्हा एकदा पदभार स्वीकारला. मागील विधानसभा निवडणुकीमध्ये कलेढोण मध्ये भाजपा उमेदवार जयकुमार गोरे यांचा उघड प्रचार मध्ये सरपंच प्रतिनिधी सुहास शेटे यांनी व नवीन कलेढोण भाजपा टीम ने केला. सरपंच यांच्यावर विरोधी गटाने विविध आरोप शृंखला सुरू ठेवली. याला तोंड देत पुढील अडीच वर्षाचा कालावधी यशस्वी पार केला. जलसंधारण खाडाखोड आणि पती हस्तक्षेप या मुद्द्यावर विभागीय आयुक्त सरपंच यांना पदावरून हटविण्याचा निर्णय दिला. सदर निकाल मान्य नसल्याने सरपंच यांनी महाराष्ट्र शासन ग्रामविकास खात्याकडे रीतसर अपील दाखल केले.सदर अपील वर ग्रामविकास मंत्री ना.जयकुमार गोरे यांनी स्थगिती दिली.यामुळे पुन्हा कलेढोण मध्ये भाजपा गट चा व हनुमान पॅनेल संपूर्ण सहकार्य असलेला सरपंच पदी पुन्हा तिसर्यांदा मिरवणुक काढून सरपंच पदभार स्वीकारला.
कदाचित सलग तीन वेळा पदभार घेणारे आणि या राजकीय घडामोडीत आरोप प्रत्यारोप सुरू असताना ग्रामपंचायत , बीडीओ ,सीईओ, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि शेवटी मंत्रालय पायरी चढणार्या पहिल्या महिला सरपंच प्रीती शेटे ठरल्या आहेत. त्याचं कार्यकाला मधील प्रत्येक विकास कामामध्ये भ्रष्टाचार तक्रारी विरोधकांनी केल्या होत्या एकही आरोप सिद्ध करण्यात विरोधक यशस्वी झाले नाहीत.संजीव साळुंखे ,सोमनाथ शेटे,राजेंद्र लोखंडे,अनिल भोसले, यांनी या प्रकियामध्ये ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे ,माजी आमदार डॉ. येळगावकर, भाजप खटाव तालुका विधानसभा प्रमुख सोमनाथ भोसले, विशाल बागल, यांनी केलेल्या सहकार्य व स्थगिती निर्णयाबद्दल त्यांचे आभार मानले.