
दैनिक स्थैर्य | दि. ९ सप्टेंबर २०२३ | सातारा |
फलटण एज्युकेशन सोसायटीमार्फत फलटणमध्ये ‘सरस्वती संगीत अकादमी’ या नावाने गायन, वादन आणि नृत्य या कलांचे अध्यासन नुकतेच सुरू केले आहे. दि. ०४ ऑगस्ट २०२३ पासून गायनाचे वर्ग सुरू झाले आहेत.
सुरूवातीला प्रत्येक शुक्रवारी आणि शनिवारी सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत वर्ग सुरू केले आहेत. तज्ज्ञ, अनुभवी गुरूंचे मार्गदर्शन आणि दर्जेदार सुविधा हे या अकादमीचे वैशिट्य आहे. ३ ते ५ वर्षे संगीत शिक्षण घेतल्यास इयत्ता १० वीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये २ ते ३ टक्के अतिरिक्त गुण मिळतात.
आपल्या सोईच्या वेळांमध्ये आपणास या अकादमीत संगीत शिकता येईल. विद्यार्थी आणि पालक अशा सर्वांसाठी खुल्या असलेल्या या उपक्रमाचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मुधोजी हायस्कूल, फलटण यांच्याकडून करण्यात आले आहे.
संपर्कासाठी पत्ता – सरस्वती संगीत अकादमी, मुधोजी हायस्कूल समोरील बिल्डिंग (संस्थेचे जुने ऑफिस), फलटण.
अधिक माहितीसाठी मोबा. नं. ९४०५७४६४१९, ९२२५५२५३५२ या क्रमांकांवर संपर्क साधावा.