दैनिक स्थैर्य | दि. ६ जून २०२३ | सातारा |
माहुली येथील संतोषभाऊ जाधव यांच्यावर दोघाजणांनी कोयत्याने सपासप डोक्यात वार केले असल्याची घटना घडली आहे. संतोषभाऊ यांच्या डोक्यात कोयत्याने वार झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. घटनेनंतर संतोषभाऊ यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी संतोषभाऊ यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले आहे.
संतोषभाऊ जाधव यांच्याकडे आज सायंकाळी दोघेजण माफी मागण्याच्या बहाण्याने गेले होते. संतोषभाऊ जाधव यांच्याशी त्यांचा संवाद सुरू असताना त्या दोघांनी आपल्याजवळील धारदार कोयत्याने संतोषभाऊ यांच्या डोक्यात सपासप वार केले. घटनेनंतर ते दोघेजण तेथून पसार झाले आहेत. संतोषभाऊ यांच्या डोक्यात कोयत्याचे वार लागल्याने मोठा रक्तस्त्राव झाल्याचे समजते. संतोषभाऊ यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे.