स्थैर्य, फलटण : येथील प्रसिध्द कचोरी करणारे संतोष खंडेलवाल यांच काल (दि.27) रोजी अल्पश्या आजाराने निधन झाले.
कै. राधाकिशन खंडेलवाल(शर्मा) यांची कचोरी बनवण्याची हातोटी ही ईश्वराने दिलेली देणगीच होती. वाढत्या मागणीमुळे त्यांनी कचोरी च्या रेसिपी व चवी मध्ये कधी फरक पडू दिला नाही. तोच वारसा अखंडित पणे पुढे त्यांचे चिरंजीव संतोष खंडेलवाल यांनी समर्थपणे सुरू ठेवला. परंतु गेली एक दोन वर्षात संतोष यांची प्रकृती बिघडले कारणाने हाच वारसा पुढे संतोष यांच्या सुविध्य पत्नी सरोजभाबी व चि. गौरव यांनी सुरु ठेवला आहे.
फलटण नगरीच्या खवय्यांसाठी गेली चार पाच दशके ज्या खंडेलवाल कुटुंबीयांनी टेस्टी कचोरीच्या माध्यमातून एक अभूतपूर्व अशी सेवा प्रथम कै. राधाकिशन खंडेलवाल (शर्मा) यांनी देऊन टेस्टी कचोरी हा काय प्रकार असतो, याची फलटणकरांना ओळख करून दिली. त्यांच्या दोन्ही चिरंजीव पैकी थोरले डॉ. राजगोपाल खंडेलवाल यांनी समाजातील सर्व स्तरातील लोकांना आजचे महागाईचे काळात माफक दरात वैद्यकीय सेवा पुरविणे हे सामाजिक भान आणि कर्तव्य समजून जनमानसात एक आपुलकीची भावना निर्माण केलेली आहे.