संतकृपा फाऊंडशनतर्फे वारकर्‍यांचा सन्मान


दैनिक स्थैर्य । 9 जुलै 2025 । फलटण । आळजापूर येथील श्री विट्ठल रूक्मिणी मंदिरात संतकृपा फाउंडेशनच्यावतीने आळंदी ते पंढरपूर पायी वारी साठी गावातून गेलेल्या वाकरी व दिंडी चालकांचा सन्मान करण्यात आला.

त्याचबरोबर गेले महिनाभर तसेच प्रत्येक बुधवारी जे भाविक विठ्ठल मंदिरात सेवा देतात तसेच हरिपाठ म्हणणार्‍या सर्व भाविकांचा सन्मान करण्यात आला. आषाढी एकादशी निमित्त खंडाळा येथे जिल्हास्तरीय भजनी स्पर्धेत श्री गणेश भजनी मंडळ यांचा तृतीय क्रमांक पटकावल्याबद्दल सन्मान करण्यात आला.

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर बुधवारी भजनाच्या माध्यमातून सेवा देणारे हनुमान नवतरुण भजनी मंडळ यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी भागातील दिंडी चालक, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत हरिपाठाने कार्यक्रमास सुरवात करण्यात आली.

यावेळी संतकृपा उद्योग समुह संस्थापक विलासराव नलवडे, दिंडीचालक विजय बोबडे (बिबी), दिंडीचालक सुभाष शिंदे, युवा कीर्तनकार रोहित शिंदे (कोपर्डे), के. व्ही. अनपट (आदर्की बु) यांनी यावेळी मार्गदर्शन केले..

यावेळी आदर्की, कोपर्डे, बिबी येथील वारकरी तसेच आळजापूर येथील ग्रामस्थ, युवक, महिला, संतकृपा फाउंडेशन सदस्य उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!