दैनिक स्थैर्य | दि. २२ फेब्रुवारी २०२३ | फलटण |
संत रोहिदास महाराज जगाला शांततेचा संदेश देणारा महान तप:स्वी होते, असे प्रतिपादन आमदार दीपकराव चव्हाण यांनी केले.
संत रोहिदास चॅरिटेबल सोसायटीच्या वतीने मथुराबाई सांस्कृतिक भवन येथे संत रोहिदास महाराज जयंती सोहळा संपन्न झाला. त्यावेळी आमदार दीपकराव चव्हाण बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना आमदार दीपकराव चव्हाण म्हणाले की, संत रोहिदास महाराजांनी जगाला मानवतेचा व शांततेचा महान संदेश दिला. ते महान तप:स्वी होते. आपण सर्वांनीच जातीपातीच्या शृंखलेमध्ये न अडकता आपण सर्वांनीच बंधूभावाने एकत्रित राहायला पाहिजे. संत रोहिदास महाराजांचे विचार सर्व विश्वाला तारणारे आहेत.
यावेळी संत रोहिदास महाराज गौरव पुरस्कार, लोणंदचे श्री. प्रवीण रणवरे यांना आमदार दीपकराव चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
प्रवीण रणवरे याप्रसंगी म्हणाले, संत रोहिदास महाराज गौरव पुरस्कारामुळे मला पुन्हा एकदा नवीन उमेदीने सामाजिक कार्य करण्यासाठी ऊर्जा मिळणार आहे. मी संत रोहिदास चॅरिटेबल सोसायटीचा सदैव ऋणी राहीन.
याप्रसंगी प.पू. राजनकाका देशमुख महाराज यांनीही विचार व्यक्त केले. प्रास्ताविक श्री. अरुण खरात यांनी केले. सूत्रसंचालन प्राचार्य विठ्ठल हंकारे यांनी, तर सागर भोईटे यांनी आभार मानले.
संत रोहिदास महाराज जयंती सोहळ्यासाठी श्री संत रोहिदास चॅरिटेबल सोसायटीचे अध्यक्ष श्री. भोेलेनाथ भोईटे व त्यांच्या सर्व संचालकांनी प्रयत्न केले.
याप्रसंगी श्री. ज्ञानेश्वर भगत, श्री. गणपतराव भोसले, प.पू. राजनकाका देशमुख महाराज, श्री. बापूसाहेब तुकाराम जगताप, जादूगार शिवम, पत्रकार श्री. नसीरभाई शिकलगार, सौ. प्रगती कापसे, युवा जनमतचे संपादक श्री. युवराज पवार, पुण्यनगरीचे पत्रकार यशवंत खलाटे व श्री. दत्तात्रय शिवदास यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी गणेश भोईटे व समर्थ प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते, संतोष भोईटे, सचिन रणवरे, सौ. ज्योती खरात, प्रा. गंगाधर आगवणे, श्री. हृदयनाथ भोईटे, श्री. रोहिदास पवार, डॉ. रोहिदास साळे, शिवाजी भोईटे, श्री. सतीश साळुंखे (महाबळेश्वर), श्री. अविनाश डोळस, श्री. संतोष पोटफोडे, श्री. बंडू दोशी, अशोक भगत व तालुक्यातील सर्व भक्तगण उपस्थित होते.
श्री. संतोष दगडे, श्री. कैलास सोडमिसे, श्री. सूर्याजी जगताप व श्री. बाळकृष्ण जाधव हेही उपस्थित होते.