आळंदी व पंढरपूर धार्मिक स्थळांना जोडणार्‍या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची ना. नितीन गडकरी यांच्याकडून पाहणी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ११ मार्च २०२३ | फलटण |
महाराष्ट्रातील आळंदी व पंढरपूर या दोन महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना जोडणार्‍या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची आज केंद्रीय मंत्री श्री. नितीनजी गडकरी यांनी खासदार श्री. रणजितसिंह नाईक निंबाळकर व अधिकारी यांच्यासह पाहणी केली.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग (राष्ट्रीय महामार्ग – ९६५) हा २३४ किमी लांबीचा मार्ग हडपसर (पुणे) – सासवड – जेजुरी – निरा – लोणंद – फलटण – नातेपुते – माळशिरस – बोंडले – वाखरी – पंढरपूर असा असून या चौपदरी रस्त्याच्या दोन्ही बाजूला वारकर्‍यांच्या सोयीसाठी स्वतंत्र पालखी मार्ग समाविष्ट करण्यात आला आहे. या मार्गावर एकूण १२ पालखी स्थळे असून या ठिकाणी वारकर्‍यांसाठी आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात येतील.

सदर पालखी मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूस वृक्षारोपण करण्याबरोबरच आवश्यक त्या ठिकाणी महाराष्ट्रातील संत महात्म्यांची शिल्पे, भित्तीचित्रे, अभंगवाणी इ. बाबींवर आधारित काम करण्यात येईल. यामुळे मार्गाच्या सौंदर्यात भर पडेल तसेच वारकर्‍यांना वारीच्या दरम्यान या सुविधांचा फायदा होईल.

पालखी मार्गावर विशिष्ट प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात येणार असून यामध्ये विशेषतः चंदन, तुळशी, इतर सुगंधित वृक्षांबरोबरच वड, कडूनिंब, पिंपळ, चिंच या सावली देणार्‍या वनौषधी वृक्षांची लागवड करण्यात येत आहे. सद्य:स्थितीत रस्त्याच्या मध्यात ५७,२०० व दोन्ही बाजूस मिळून १८,८४० वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.


Back to top button
Don`t copy text!