दैनिक स्थैर्य | दि. ५ एप्रिल २०२४ | सातारा |
श्री रामदास स्वामी संस्थान, सज्जनगड यांच्यातर्फे दि. २७ एप्रिल ते दि. ५ मे २०२४ या कालावधीत ९ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांसाठी श्री समर्थ समाधी मंदिर परिसर, सज्जनगड येथे संस्कार शिबिराचे आयोजन केले आहे.
या संस्कार शिबिरात सहभागी होण्यासाठी संस्थानच्या वेबसाईटद्वारे प्रवेश फॉर्म भरणे आवश्यक आहे. हा फॉर्म दि. ५ एप्रिल २०२४ रोजी वेबसाईटवर उपलब्ध करण्यात येईल.
शिबिराच्या अधिक माहितीसाठी सौ. संस्कार शिबिर प्रमुख संगीताताई कुलकर्णी ८६५२५२४०२२, मुख्य समन्वयक स.भ. कौस्तुभ जोशी ९३०९११०५२८ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन संस्थानतर्फे करण्यात आले आहे.
संस्थानची वेबसाईट – www.ramdasswami.org
फेसबुक आणि इन्स्टा – @sajjangadsansthan