संजय राऊतांचा अक्षय कुमारवर निशाना : राऊत म्हणाले- अक्षय कुमारने मुंबईला पाकिस्तान म्हटल्याचा विरोध करायला हवा, मुंबई फक्त पैसे कमावण्यासाठीच आहे का ?

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, मुंबई, दि.१३: कंगनाच्या मुंबईला पाकिस्तान म्हटल्याच्या कमेंटचा विरोध न केल्यावरून शिवसेना नेते संजय राउत यांनी अभिनेता अक्षय कुमारवर निशाना साधला आहे. त्यांनी शिवसेनेचे मुखपत्र सामना मध्ये त्यांनी कडक शब्दात प्रश्न उपस्थित केला की, मुंबई फक्त पैसे कमावण्यासाठीच आहे का?

मुंबईचा अपमान झाला तरी सर्व खाली मान घालुन बसतात: राऊत

राऊत पुढे म्हणाले की, जेव्हा कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली, तेव्हा अक्षय कुमारसारख्या अभिनेत्यांनी समोर येऊन म्हणायला हवे होते की, कंगनाचे मत वयक्तिक आहे. याचा संपूर्ण चित्रपट क्षेत्राशी संबंध नाही. मुंबईने सर्वांनाच खूप काही दिले आहे. जगभरातील श्रीमंतांचे घर मुंबईत आहे, पण शहराचा अपमान होत असेल, तेव्हा सर्व मान खाली घालुन बसतात.

मुख्यमंत्र्यांना अरेतुरेची भाषा केल्यामुळे भडकले

बीएमसीकडून ऑफीस तोडल्यानंतर कंगना रनोटने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाना साधला होता. त्यांनी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केला होता. यावर राऊत यांनी कठोर शब्दात निंदा केला. राऊत म्हणाले की, एक नटी (अॅक्ट्रेस) मुंबईमध्ये बसून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करते. यावर राज्यातील कोणीच प्रतिक्रीया देत नाही, हे कसले स्वातंत्र्य?

‘पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राइक झाल्यावर नाराज होते’

राऊत यांनी पुढे लिहीले की, जेव्हा कंगनाच्या अवैध बांधकामावर बुलडोझर चालतो, तेव्हा ती ड्रामा करते. या ऑफीसला राम मंदिर असल्याचे सांगते. तिने हे लक्षात ठेवावे की, तिचे हे अवैध बांधकाम तिने उल्लेख केलेल्या याच पाकव्याप्त काश्मीरमध्ये होते. आधी मुंबईला पाकिस्तान म्हणते, आणि जेव्हा याच पाकिस्तानातील अवैध बांधकामावर सर्जिकल स्ट्राइक होते, तेव्हा नाटक करते. संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीने नाही, पण कमीत कमी अर्ध्या इंडस्ट्रीने तरी याचा विरोध करायला हवा.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!