
स्थैर्य, दुधेबावी, दि. 24 : कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर कोरोना रोगास लढा देण्यासाठी आयडिबीआय बँकेंची फलटण शाखाही समोर आली आहे. त्याचाच भाग म्हणून आयडिबीआय बँकेच्या फलटण शाखेकडून फलटण नगरपालिकेस अँटोमँटीक मशिन शाखाप्रमुख अजित धायगुडे यांच्या हस्ते नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांचेकडे सुपुर्द करण्यात आली. यावेळी ऋण अधिकारी प्रसुन वर्मा, सेल्स मँनेजर अशोक ओतेकर, नगरपालिकेचे लेखाधिकारी महेश सांवत, सहाय्यक अधिकारी अरुण पोवार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बँकेतर्फे चार आँटोमँटीक सँनिटायजर मशिन आणि शंभर लिटर सँनिटायजर नगरपालिकेस देण्यात आले. यातील तीन मशिन नगरपालिकेच्या कार्यालयात आणि एक मशिन नगरपालिकेच्या हाँस्पिटलमध्ये ठेवण्यात आल्या आहेत.बँकेच्या या उपक्रमाचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी कौतुक करुन आभार मानले.