
दैनिक स्थैर्य । 15 मे 2025। फलटण । येथील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील धडाडीचे युवा कार्यकर्ते संदीपकुमार जाधव यांनी भारतीय जनता युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदाचा राजीनामा देत भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकला आहे. आपले राजीनामा पत्र युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष चिन्मय कुलकर्णी यांना त्यांनी पाठवले आहे.
सुरुवातीला अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, संस्कार भारती या संस्थांमधून कार्यरत असणारे संदीपकुमार जाधव हे भाजपचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या माध्यमातून सन 2014 – 15 पासून भारतीय जनता युवा मोर्चामध्ये फलटण शहराध्यक्ष म्हणून सक्रीय झाले. त्यानंतर सुमारे दीड वर्षापूर्वी त्यांच्यावर युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. युवकांचे संघटन, पक्षाची आंदोलने, मोर्चे, लोकसभा व विधानसभा निवडणूका यामध्ये संदीपकुमार जाधव यांनी सक्रीय योगदान दिले आहे.
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, फलटण नगरपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्त्वात कार्यरत असणारे संदीपकुमार जाधव यांनी नेतृत्त्वावर कोणतीही नाराजी नसताना स्थानिक अंतर्गत राजकारणाला कंटाळून राजीनामा दिला आहे कां? भाजपच्या राजीनाम्यानंतर आता ते कोणती राजकीय वाट पकडणार? याबाबत उलट – सुलट चर्चा त्यांच्या निकटवर्तीयांमधून होताना दिसत आहे