
दैनिक स्थैर्य | दि. १२ एप्रिल २०२४ | फलटण |
फलटण येथील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते संदीप दौलतराव चोरमले यांची भारतीय जनता पार्टीच्या सातारा जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, माजी मंत्री बाळा भेगडे, भाजपाचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
चोरमले यांच्या पक्षातील संघटनात्मक आणि सामाजिक कार्याची दखल घेऊन ही नियुक्ती करण्यात आल्याचे नियुक्तीपत्रात म्हटले आहे. त्यांच्या निवडीमुळे भाजपाचे सातारा जिल्ह्याधमील संघटन आणखी मजबूत होईल व भारतीय जनता पार्टीचे विचार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आपण पोहोचवाल, असा विश्वास या नियुक्तीवेळी पार्टीने व्यक्त केला आहे.
या निवडीबद्दल संदीप चोरमले यांचे भाजपाचे सातारा जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.