दैनिक स्थैर्य | दि. २७ जानेवारी २०२४ | फलटण |
मलठणमधील जिंती नाका परिसर, सिद्धिविनायक मंदिर रोड व आईसाहेब नगर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख २५ ते ३० कार्यकर्त्यांनी आपल्या सहकार्यांसह खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन समशेरसिंह नाईक निंबाळकर, अभिजीत नाईक निंबाळकर व अशोकराव जाधव तसेच गोसावी समाजातील प्रमुख सुनिल घोलप, संदीप जाधव, भाजप जिल्हा कार्यकारणी सदस्य व रमेश जाधव भाजप भटके विमुक्त आघाडी शहर अध्यक्ष व भरत जाधव, बाळासाहेब जाधव, संग्राम सावंत यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
जिंती नाका परिसरातील मनोज जाधव, धनंजय जाधव, पोपट जाधव, नेहाल जाधव, प्रदीप पाटोळे तसेच आईसाहेब नगर येथील विजय गिरी व सिद्धिविनायक मंदिर रोड येथील जयराम माळी, शिवाजी माळी, शहाजी माळी, पांडुरंग माळी, सुरेश माळी, अमर माळी, संदीप माळी, अजय माळी, भीमराव माळी, शंकर माळी, रंगराव माळी, संदीप पोपट जाधव, सोमनाथ माळी, मनोज कुलकर्णी, प्रदीप पाटोळे, हनुमंत माळी या सर्व कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. त्यांचे गटनेते अशोकराव जाधव यांनी स्वागत करून गोसावी समाजाच्या असणार्या अडचणी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून सोडविण्याचे आश्वासन दिले.
यावेळी फटायांच्या आतिषबाजीत आनंद व्यक्त केला. याप्रसंगी खासदार रणजितसिंह, समशेरसिंह, अभिजीत भैय्या यांनी सर्वांना धन्यवाद दिले.