संभाजीनगरात सोमवारपासून 7 दिवसांचा लॉकडाऊन लागणार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य,दि. 6: संभाजीनगर शहरातील कोरोनाचा पुन्हा झालेला उद्रेक पाहाता संपूर्ण शहरात पुन्हा लॉकडाऊन करण्यात येणार असल्याची खात्रीशीर माहिती दै.सामनाला मिळाली आहे. सोमवारपासून पुढचे सात दिवस लॉकडाऊन करण्यात येणार असल्याचे प्रशासनातील एका उच्चस्तरीय अधिकाऱ्याने सांगितले आहे. मास्क सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंग संभाजीनगरकर विसरले आहेत. कोरोना झाला तरी काही होत नाही ही बेपर्वाई वाढल्यामुळे जी भीती होती तेच झाले आहे.

संभाजीनगर शहरात कुटुंब संसर्गाचा उद्रेक झाला असून दररोज 300 नवे रुग्ण शहरात सापडत आहेत. रुग्ण पॉझिटीव्हिटीचा दर 13 टक्क्यांवर गेला आहे. रुग्णसंख्या याच गतीने वाढत राहिल्यास प्रशासनासमोर पुन्हा कडक निर्बंध लादण्याशिवाय पर्याय नसेल असे सांगितले जात होते. शहरातील कोविड सेंटर खचाखच भरली असून खासगी रुग्णालयेही फुल्ल झाली आहेत. बेड मिळवण्यासाठी रुग्णांना मोटरसायकलवर वणवण करण्याची वेळ आली आहे. कोरोनाची चाचणी ज्या केंद्रांवर करण्यात येते तिथेही मोठ्या रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

नागरिकांचा बिनधास्तपणा त्यांच्या चांगलाच अंगलट आला आहे. कोरोनाचा पुन्हा एकदा उद्रेक सुरू झाला असून शुक्रवारी संभाजीनगर जिल्ह्यात तब्बल 459 कोरोनाबाधितांची नव्याने भर पडली. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 52 हजार 103 झाली आहे. आतापर्यंत 47 हजार 909 रुग्ण कोरोनातून बरे झाले असून आजपर्यंत कोरोनामुळे जिल्ह्यात 1284 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 2910 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.


Back to top button
Don`t copy text!