
दैनिक स्थैर्य । 13 मे 2025। सातारा । सालोशी, ता. महाबळेश्वर या गावाचा कांदाटी खोर्यातील पहिले मधाचे गाव म्हणून समावेश करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, सनियंत्रण समिती यांनी शिफारस केलेल्या व महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निश्चित केलेल्या 10 गावांना मधाचे गाव म्हणून विकसित करण्यात येणार आहे. या 10 गावांमध्ये राज्यपालांच्या आदेशानुसार कांदाटी खोरे एकात्मिक विकास प्रकल्प राबवितण्यात येत आहे. हाबळेश्वर तालुक्यातील अति दुर्गम भाग म्हणून ओळख असलेल्या कांदाटी खोर्यातील सालोशी या गावाचा समावेश करण्यात आला आहे.
राज्यातील भौगीलिक परिस्थिनुसार नैसर्गिक साधन संपत्ती व मुबलक फुलोरा असणार्या भागातील मधमाशा संवर्धन करणे व मधु पर्यटनाचा विकास करणे यासाठी राज्य शासनाकडून मधाचे गाव हि योजना राबविण्यात येते.
सालोशी हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे गावापासून अवघ्या 30 किलोमीटर अंतरावर आहे. गावातील 100 टक्के कुटुंबे शेती पूरक व्यवसाय म्हणून मधमाशा पालनाचा व्यवसाय करतात. गावाला मधाचे गाव म्हणून मान्यता मिळण्यासाठी गावातील मध उत्पादक शेतकर्यांनी कांदाटी खोरे मध उत्पादक शेतकरी गट स्थापन केला होता. या गटामार्फत स्वच्छ व नैसर्गिक मध उत्पादन करणे, मधाची विक्री व्यवस्था विकसित करणे यासाठी काम करण्यात येत आहे. कांदाटी खोरे एकात्मिक विकास प्रकल्पांतर्गत पुणे येथील प्रायमूव्ह संस्थेचे अधिकारी, गावातील ग्रामपंचायतीचे आजी माजी सदस्य, मध उत्पादक गटाचे सर्व पदाधिकारी, व ग्रामस्थ यांनी मधाचे गाव होण्यासाठी घेतलेल्या परिश्रमाचे फळ असल्याचे मत सरपंच सौ. नंदा चव्हाण यांनी व्यक्त केले.
यावेळी त्यांनी कांदाटी खोरे प्रकल्प व्यवस्थापन कक्ष, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा खादी ग्राम उद्योग अधिकारी, गट विकास अधिकारी, मध संचालनालय जिल्हा, तालुका व गाव स्तरावरील सर्व प्रशासकीय अधिकारी यांनी सहकार्य केले.

