नागरिकांनी रुग्णालय व विलीगीकरण यातील फरक समजून घ्यावा : प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि. २१ : तालुक्यातील वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे शहरातील व तालुक्यातील असणाऱ्या रूग्णालयांचे बेड्स अपुरे पडत आहेत. उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे यांनी सुरु केलेल्या सजाई गार्डन कोव्हिडं हेल्थ केअर सेंटरमध्ये सध्या विलगिकरण कक्ष उभारण्यात आला आहे. यामुळे अनेक कोरोनाबाधित रुग्ण याठिकाणी दाखल होण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. मात्र, नागरिकांनी विलगिकरण कक्ष व रुग्णालय यातील फरक समजून घ्यावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी तथा इनसिडन्ट कमांडर डॉ. शिवाजी जगताप यांनी केले आहे.

करोना विषाणूचा संसर्ग पसरू नये यासाठी संसर्गजन्य प्रदेशांतून प्रवास करून आलेल्या प्रवाशांचे विलगीकरण (क्वारंटाईन) केले जात आहे. रुग्णालयांमधून रुग्णांनी याची धास्ती घेऊन पळ काढला. मात्र, हे विलगीकरण त्या रुग्णासह समाजाच्याही हितासाठी आहे. ही प्रक्रिया नेमकी काय आहे हे समजून घेणे गरजेचे आहे. कोरोना वर उपचार करण्यासाठी असलेले रुग्णालय व विलीगीकरण या मध्ये बराच फरक आहे. कोरोना व्हायरसच्या रुग्णांपासून इतर कुणालाही त्याची लागण होऊ नये यासाठी क्वारंटाईन म्हणजेच विलीगीकरण केलं जातं. संसर्गजन्य आजारात रुग्णाच्या सोबत राहणाऱ्या व्यक्तींना आजार होण्याची शक्यता सर्वाधिक असते. तर रुग्णाच्या संपर्कात येणाऱ्या सगळ्यांनाच कोरोना व्हायरसपासून धोका आहे. म्हणूनच सजाई गार्डन येथे विलीगीकरण कक्ष सुरु करण्यात आलेला आहे, अशी माहिती प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी दिली.

“खोकल्यापासून बाहेर आलेले पार्टिकल्स 6 फूटापर्यंत असलेल्या व्यक्तीला संसर्ग करु शकतात. सहा फूटाअंतर्गत व्यक्ती असेल तर त्याला संसर्ग होऊ शकतो हे स्पष्ट आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसची लक्षणं दिसल्यास त्यांचा संपर्क इतर कुणाशी झाल्यास संसर्ग वाढू शकतो. म्हणून त्रास होत असलेल्या व्यक्तीने वेगळं राहणं गरजेचं आहे.” प्रत्येकालाच क्वारंटाईन व्हा असं डॉक्टर्स सांगत नाहीत. पण एखाद्याला त्रास होत असल्यास तो व्यक्ती घरच्याघरीही काळजी घेवू शकतो. कुटुंबीयांपासून सहा फूट अंतर ठेवावं. घरी वावरतानाही तोंडावर रुमाल बांधावा. आपलं साहित्य वेगळं ठेवावं. त्या साठी विलीगीकरण करण्यात येत असत. कोरोनाचा फैलाव वाढू नये म्हणून विलीगीकरण कक्ष हे अत्यंत उपयुक्त ठरणार आहे, असे हि प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी स्पष्ट केले.

जर तुम्हाला ताप, खोकला,सर्दी अशी काही लक्षणं दिसून येत असतील तर सगळ्यात आधी डॉक्टरांना फोनवर संपर्क साधणे गरजेचे आहे. जर तुम्हाला काही मेडिकल उपचार घ्यायचे असल्यास तुम्हाला म्हणजेच कोरोना बाधित रुग्णांना नजीकच्या हॉस्पिटल मध्ये भरती होणे गरजेचे आहे. ज्या रुग्णांना कोणताही त्रास होत नाही परंतु त्यांची घराची अडचण आहे. होम आयसोलेशन होऊ शकत नाही, त्यांनाच फक्त सजाई गार्डन येथील विलीगीकरण कक्षात दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती या वेळी प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी दिली.

कोरोनाबाधित रुग्णांच्या घरी जर विलीगीकरणाची सोय नसेल तर त्यांना सजाई गार्डन येथील विलीगीकरण कक्षामध्ये दाखल करण्यात येणार आहे. जर एकाद्या कोरोना बाधित रुग्णाला हॉस्पिटल मध्ये बेड्स उपलब्ध होत नसतील, तर त्यांना बेड्स उपलब्ध होईपर्यंत त्यांना येथील सजाई गार्डन कोरोना केअर सेंटर मध्ये दाखल करण्यात येणार आहे. परंतु त्या रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड्स उपलब्ध झाल्यानंतर पुन्हा त्यांना हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात येणार आहे, असे हि प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी स्पष्ट केले.


Back to top button
Don`t copy text!