स्थैर्य, फलटण, दि. ०१ : संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त कुरवली येथील वृद्धाश्रमात धान्य वाटप करून वृद्धश्रमास आर्थिक मदत केली. सोशल डिस्टनसिंगचे पालन करीत संत रोहिदास महाराजांना चर्मकार समाज बांधवांनी या वेळी अभिवादन केले.
यावेळी संत रोहिदास चॅरिटेबल सोसायटीचे अध्यक्ष भोलेनाथ भोईटे, नगरसेविका सौ. ज्योती खरात, सौ. रेश्मा भोईटे,सौ. अर्चना भोईटे, प्रा. विठ्ठल हंकारे, विस्तार अधिकारी हृदयनाथ भोईटे, सागर भोईटे, रोहिदास पवार, अरुण खरात, गणेश भोईटे, कमलाकर डोईफोडे व इतर मान्यवर उपस्थित होते.
फलटण शहर व तालुक्यातील चर्मकार बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त फार मोठ्या प्रमाणात कार्यक्रम आयोजित करण्यात येणार होते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व शासनाच्या वतीने आवाहन केल्याप्रमाणे ठराविक समाज बांधवांच्या उपस्थितीत साधेपणाने जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
कुरवली ता.फलटण येथील वृद्धाश्रमात धान्य व इतर साहित्य देत एक वेगळा संदेश देत खऱ्या अर्थाने माणुसकी जपण्याचा प्रयत्न चर्मकार बांधवानी केला आहे. यावेळी कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता विविध शाळेतील मुलांना मास्कचे वाटप करण्यात आले.