साईबाबांचे विचार आजही प्रेरक : सुनेत्रा पवार

बिरजू मांढरे यांच्या वतीने सलग बाराव्या वर्षी साई पालखी सोहळ्याचे आयोजन


दैनिक स्थैर्य | दि. १७ नोव्हेंबर २०२३ | बारामती |
साईबाबा पालखी सोहळ्यातून साईबाबांच्या विचारांचा प्रचार व प्रसार होत आहे. साईबाबांचे विचार आचरणात आणल्यास मनुष्य जीवन समाधानी व आनंदी राहू शकते.आध्यात्मिक ताकद देण्यासाठी साईबाबांचे विचार आजही प्रेरक असल्याचे प्रतिपादन ‘बारामती हाय टेक्सटाईल पार्क’च्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी केले.

मा. उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली साईच्छा सेवा ट्रस्टच्या माध्यमातून बारामती ते शिर्डी पायी पालखी सोहळ्याचा शुभारंभ करताना सुनेत्रा पवार बोलत होत्या. याप्रसंगी मा. नगरसेवक किरण गुजर, मा. नगराध्यक्षा भारती मुथा व अनिता जगताप, राजेंद्र बनकर, शिर्डी राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष सोनू कुलकर्णी, राष्ट्रीय श्रीराम संघ तालुकाध्यक्ष पै. मदनभाऊ मोकाटे, आरपीआय नगर जिल्हाध्यक्ष सुमनभाऊ जगताप, निमगाव उपसरपंच मछिंद्र वदक, शनी शिंगणापूरचे सरपंच रमेश सोनावणे, घारगावचे उद्योजक मनीष खुराणा, शब्बीर शेख, तैनूर शेख, मिलिंद संगई, सुनील शिंदे, शब्बीरभाई बारामतीवाला, डॉ. सौरभ मुथा व इतर मान्यवर उपस्थित होते.

पायी पालखी सोहळ्यातून व्यसनमुक्ती व पर्यावरण, स्वछताचे आदर्श काम होत असल्याबद्दल सुनेत्रा पवार यांनी समाधान व्यक्त करून बारामतीचा आदर्श पालखी सोहळा असल्याचे सुनेत्रा पवार यांनी सांगितले.

बिरजू मांढरे यांनी गोरगरीबांची सेवा करून व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे पाठपुरावा करत डॉ. आंबेडकर वसाहतचे काम पूर्ण करून खरी साई सेवा केल्याचे मा. नगरसेवक किरण गुजर यांनी सांगितले.

१२ वर्षापूर्वी मोजक्याच साई भक्तांसमवेत सुरू केलेला सोहळा यावर्षी ३ ते ४ हजार भाविक सहभागी होत आहेत. बारामती तालुक्यातील पहिलाच साई विचारांचा पायी सोहळा असून भक्तीबरोबरच पर्यावरण वाढवा व व्यसन मुक्ती, गावोगावी स्वछता अभियान, वृक्षारोपण व प्रबोधन करणारा पायी पालखी सोहळा असल्याचे आयोजक बिरजू मांढरे यांनी सांगितले.

सूत्रसंचालन अनिल सावळे-पाटील यांनी केले तर आभार मा. नगरसेविका शोभाताई मांढरे यांनी मानले.

कार्यक्रमासाठी समाजभूषण भाऊसाहेब मांढरे मित्र परिवार, लहूजी वस्ताद दहीहंडी संघ, कै. श्रीहरीभाऊ तेलेंगे मित्र मंडळ, जय भवानी मित्र मंडळ यांनी विशेष परिश्रम घेतले.

हुबेहूब प्रतिकृतीत साकारलेले द्वारकामाई पालखी रथ, दांडपट्टा मर्दानी खेळ, हुबेहूब प्रतिकृतीत साकारलेला बाहुबली हनुमान व शंकर महाकालची हुबेहूब प्रतिकृतीत साकारलेल्या कलाकारांनी आपली कला यावेळी प्रदर्शित केली. तर ‘एकच वादा अजितदादा’ वाक्ये असलेले फेटे साईभक्तांना तर चमकीचे आकर्षक ‘राष्ट्रवादी’ लिहिलेले फेटे मान्यवरांना असल्याने साई भक्तीबरोबरच अजितदादा यांच्याबद्दल असलेली निष्ठा या फेट्यांच्या माध्यमातून दिसत होती.


Back to top button
Don`t copy text!