सार्वजनिक जीवनातील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड – प्रा.एन.डी. पाटील यांना सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची श्रद्धांजली

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.१७ जानेवारी २०२२ । मुंबई ।  ज्येष्ठ नेते, माजी सहकार मंत्री प्रा. एन.डी. पाटील यांच्या निधनामुळे सार्वजनिक जीवनातील एक ऋषितुल्य, लढवय्ये, लोकाभिमुख व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे, अशा शब्दात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी प्रा. एन. डी. पाटील यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

शोकसंदेशात श्री.चव्हाण यांनी नमूद केले आहे की, प्रा.एन. डी. पाटील हे विधिमंडळातील आणि चळवळीतील धडाडती तोफ होते. त्यांच्या निधनाने शेतकरी व कष्टकऱ्यांचा एक बुलंद आवाज हरपला आहे. त्यांचे संपूर्ण जीवन लोकांसाठी समर्पित राहिले. शिक्षण क्षेत्रातही त्यांनी मोठे योगदान दिले. सार्वजनिक संस्थांचा कारभार कसा चालवावा, याचे उत्तम उदाहरण त्यांनी घालून दिले होते. आचार, विचार आणि कर्तृत्वाने राजकारणात व समाजकारणात त्यांचे एक वेगळे स्थान निर्माण झाले होते. त्यांचा जीवनपट व कार्य पुढील अनेक पिढ्यांसाठी मार्गदर्शक राहिल, असे सांगून लोकनेते प्रा. एन.डी. पाटील यांना श्री. चव्हाण यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.


Back to top button
Don`t copy text!