सदाभाऊ खाडे यांची भाजपा प्रदेश कार्यकारणीवर निवड

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, वडूज, दि. ०९ : एनकुळ (ता. खटाव) येथील सुपुत्र सदाशिव दादासाहेब खाडे यांची भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारणी सदस्यपदी निवड झाली आहे.

माजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री, माजी उपमुख्यमंत्री स्व. गोपीनाथ मुंढे यांचे कट्टर समर्थक अशी त्यांची ओळख आहे. मागील युती शासनाच्या काळात त्यांनी पिंपरी चिंचवड नवनिर्माण प्राधिकारणाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) पद भूषविले होते. याशिवाय पक्ष संघटनेत पिंपरी चिंचवड शहर जिल्हाध्यक्ष, सरचिटणीस, खटाव-माण संपर्कप्रमुख आदी पदावर जबाबदारी सांभाळल्या आहेत.

पुणे, पिंपरी चिंचवडसह सातारा जिल्ह्यातील खटाव, माण व अन्य तालुक्यात भारतीय जनता पार्टीचे काम वाढविण्यासाठी ते प्रामाणिक प्रयत्नशील असतात. निवडीबद्दल त्यांचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी ग्रामीण विकासमंत्री पंकजाताई मुंढे आदिंसह मान्यवरांनी अभिनंदन केले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!