सचिन पाटील उद्या दि. २८ रोजी राष्ट्रवादीकडून अर्ज भरणार; जोरदार शक्ती प्रदर्शन


दैनिक स्थैर्य | दि. २७ ऑक्टोबर २०२४ | फलटण | फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून आज अधिकृत घोषित झालेले सचिन सुधाकर पाटील हे उद्या दि. २८ ऑक्टोबर रोजी जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.

उद्या दि. २८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता फलटण येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे; असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आले आहे.

गत ३० वर्षांपासून फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा रखडलेला विकास करण्यासाठी महायुतीच्या वतीने आपण पुन्हा विकासकामे मार्गी लावण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित येवूयात असे मत सचिन पाटील यांनी व्यक्त केले.


Back to top button
Don`t copy text!