प्रिंट व डिजीटल मिडिया पत्रकार संघटनेच्या राज्य कार्यकारणी सदस्यपदी सचिन मोरे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २४ सप्टेंबर २०२४ | फलटण |
प्रिंट व डिजीटल मिडिया पत्रकार संघटनेच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी प्रशांत चवरे यांची तर राज्य समन्वयक म्हणून तुकाराम गोडसे व राज्य कार्यकारणी सदस्यपदी फलटण येथील धैर्य टाईम्सचे संपादक सचिन संपतराव मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. थेऊरफाटा (ता. हवेली) येथे पुणे प्राईम न्यूजच्या ’इग्नायटेड स्टोअरीज’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला. यावेळी प्रिंट व डिजीटल मिडिया पत्रकार संघाच्या कार्यकारणीवर पदाधिकार्‍यांची नियुक्ती राज्याचे अध्यक्ष सुनील जगताप यांनी जाहीर केली.

यावेळी ज्येष्ठ कृषीतज्ज्ञ बुधाजीराव मुळीक, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे, आमदार अशोक पवार, मोहोळचे माजी आमदार राजन पाटील (मालक), सिने अभिनेते आरोह वेलणकर, पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रदीपदादा कंद, भाजपाचे पुणे जिल्हा उत्तर विभाग अध्यक्ष शरद बुट्टे पाटील, दैनिक सकाळचे निवृत्त सहयोगी संपादक रमेश डोईफोडे, प्रिंट व डिजीटल मिडिया पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष जनार्दन दांडगे, खजिनदार विजय काळभोर, सल्लागार तुळशीराम घुसाळकर, पुणे जिल्हाध्यक्ष राजेंद्र (बापूसाहेब) काळभोर, हवेली तालुकाध्यक्ष संदीप बोडके, उपाध्यक्ष चंद्रकांत दुंडे, अमोल अडागळे, समन्वयक अमोल भोसले, रियाज शेख, जयदीप जाधव, सुनील सुरळकर, गोरख कामठे, विशाल कदम, हनुमंत चिकणे, भाऊसाहेब महाडिक, गौरव कवडे यांच्यासह खेड, इंदापूर, शिरुर, दौंड व भोर तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘आपण आपल्यासाठी’ हे ब्रीदवाक्य समोर ठेवून फक्त पत्रकारांचा विकास हे उद्दिष्ट ठेवलेले आहे. पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांना सवलतीच्या दरात आरोग्य उपचार मिळावेत यासाठी संघटना नेहमीच कटिबद्ध आहे. संकटसमयी पत्रकार बांधवांना मदत करणे हा अजेंडा संघटनेचा कायमस्वरूपी राहणार असल्याचे सुनील जगताप, अध्यक्ष प्रिंट व डिजीटल मिडिया पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांनी सांगितले.

प्रिंट व डिजीटल मिडिया पत्रकार संघ हा पत्रकारांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. खोट्या व फसव्या आश्वासनापेक्षा प्रत्यक्षात पत्रकारांसाठी काम सुरू आहे. तसेच धावपळीच्या व ताणतणावाच्या युगात पत्रकारांच्या आरोग्याला संघटनेने प्राधान्य दिले असून विविध भाग व प्रांतातील माहिती व ज्ञान वृद्धीसाठी पत्रकारांसाठी पर्यटन सहल हा उपक्रम यशस्वीपणे राबवला आहे. हवेली तालुक्यातील पत्रकार व कुटुंबियांना सवलतीच्या दरात आरोग्य उपचार मिळत आहे. याच विचाराने पुणे जिल्ह्यातील संघटनेतील पत्रकार व त्यांचे कुटुंबीय यांनाही सवलतीच्या दरात आरोग्य उपचार मिळावेत यासाठी आम्ही बांधील आहोत, असे यावेळी प्रिंट व डिजीटल मिडिया पत्रकार संघ पुणे जिल्हाध्यक्ष राजेंद्र काळभोर यांनी सांगितले.

प्रिंट व डिजीटल मिडिया पत्रकार संघाची कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :

  • राज्य उपाध्यक्ष :- प्रशांत तानाजी चवरे
  • राज्य समन्वयक:- तुकाराम अंगद गोडसे
  • राज्य सहसचिव :- महेंद्र मोहन शिंदे
  • कार्यकारणी सदस्य :- संदीप शिवाजी सोनवणे, सचिन संपतराव मोरे

Back to top button
Don`t copy text!