दैनिक स्थैर्य | दि. 13 जून 2023 | फलटण | फलटणच्या उपविभागीय अधिकारी पदी सचिन ढोले यांच्या नियुक्तीचे आदेश काल रात्री उशिरा पारित झाले आहेत. त्यानंतर तातडीने आज पदभार स्वीकारला आहे.
पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी फलटण उपविभागाचा आढावा घेतला असून फलटण तालुक्याला साजेसे असे काम करणार असल्याचे मत त्यांनी यावेळी स्पष्ट केले.