दैनिक स्थैर्य | दि. 07 सप्टेंबर 2023 | दुधेबावी | महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित फलटण एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कृषी महाविद्यालय फलटण येथील विद्यार्थी कृषीदूत दराडे राजवर्धन, तावरे संकेत, भोसले यश, शिंदे रोहित, फाळके दिग्विजय, मेनकुदळे शिवमया विद्यार्थ्यांनी ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम दुधेबावी येथे प्रात्यक्षिकाद्वारे रांगोळी काढून गावाचे वर्णन केले.
रांगोळी द्वारे रेखाटलेल्या आराखड्यामध्ये गावातील उपलब्ध नैसर्गिक साधन वनस्त्रोत पीक लागवड क्षेत्र, ग्रामपंचायत कार्यालय शाळा विविध रस्ते तसेच गावातील प्रमुख ठिकाणे दाखवण्यात आले आहेत. सहभागी ग्रामीण मूल्यांकन पाहण्यासाठी गावातील ग्रामस्थांनी उपस्थिती दर्शवली आहे. तसेच सहभागी ग्रामीण मूल्यांकन साठी महाविद्यालयाचेप्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कार्यक्रम समन्वयक व विषय विशेषज्ञ प्रा. नीलिमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्निल लाळगे व प्रा. नीतीशा पंडित यांचे मार्गदर्शन लाभल्याचे कृषिदुतांनी सांगितले.